KL Rahul-Athiya Shetty | इंग्लंडमध्ये एकत्र नांदतायत क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी, जॅकेटने केली पोलखोल!

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीची लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांच्या नात्याची चर्चा जोरदार रंगत आहे. मात्र, या जोडीने आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोलणे टाळले आहे.

KL Rahul-Athiya Shetty | इंग्लंडमध्ये एकत्र नांदतायत क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी, जॅकेटने केली पोलखोल!
Athiya-rahul

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीची लेक, अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांच्या नात्याची चर्चा जोरदार रंगत आहे. मात्र, या जोडीने आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोलणे टाळले आहे. परंतु, हे दोघेही सिक्रेटली एकमेकांना डेट करत आहेत.  त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ही गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आली आहे. वास्तविक टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर असून, केएल क्रिकेटमधून ब्रेक घेत एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या केएल राहुलने नुकतीच इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसमवेत एक प्रश्न सत्र आयोजित केले होते. या सत्रामध्ये चाहत्यांनी त्याला त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. दरम्यान, एका वापरकर्त्याने या क्षणी आपण काय करत आहात? असे विचारले. या प्रश्नावर उत्तर देताना राहुलने आपल्या स्टोरीमध्ये एका मुलीसह एक फोटो शेअर केला.

जॅकेटने केली पोलखोल

Athiya-rahul

Athiya-rahul

या फोटोमध्ये दिसणारी मुलगी सोनाली फॅबियानी आहे, जी अथिया आणि केएल राहुलची कॉमन मैत्रीण आहे. त्याचवेळी अथियाने तिच्या चाहत्यांसमवेत तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता, यात सोनाली अगदी त्याच जॅकेटमध्ये दिसली होती, जो तिने राहुलसोबत फोटो काढताना घातला होता. तसेच, राहुल आणि अथिया यांच्या पोस्टची वेळही जवळजवळ सारखीच होती. यामुळेच ही जोडी सध्या एकमेकांसोबत नांदतेय, असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे.

या आधीही घडली अशीच गोष्ट

हे असे प्रथमच झालेले नाही. अलीकडेच अथियाने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अथियाने एक जॅकेट परिधान केले आहे. हे जॅकेट केएल राहुलचे आहे, कारण केएल राहुलनेही या जॅकेटमध्ये आपले फोटो शेअर केले होते आणि आता अथियाने देखील तेच जॅकेट परिधान केले होते. इतकेच नाही, तर अथियाने जो फोटो शेअर केला आहे, तो हॉटेलच्या रूमसारखा दिसत आहे.

दोघांचे नाते चर्चेत

राहुल आणि अथिया हे दोघेही जेव्हा कधी एकत्र दिसले, तेव्हा ते नेहमीच चर्चेत राहिले. दुसरीकडे, अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर ती बर्‍याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. अथिया नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अखेर ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात दिसली होती.

(KL Rahul And Athiya Shetty Living together in England)

हेही वाचा :

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!

‘Miss you Raji…’ पती राज कौशलच्या आठवणींनी व्याकूळ झाली मंदिरा बेदी, शेअर केली भावनिक पोस्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI