AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती बेधडकपणे आपली मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. यामुळे ती बर्‍याच वेळा वादांचा भागही बनली आहे. बॉलिवूडमध्ये चमकदार कामगिरी दाखवल्यानंतर आता कंगना ओटीटीच्या व्यासपीठावर पाऊल ठेवणार आहे.

OTT Debut | डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकणार कंगना रनौत, रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट!
कंगना रनौत
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 14, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती बेधडकपणे आपली मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. यामुळे ती बर्‍याच वेळा वादांचा भागही बनली आहे. बॉलिवूडमध्ये चमकदार कामगिरी दाखवल्यानंतर आता कंगना ओटीटीच्या व्यासपीठावर पाऊल ठेवणार आहे. तिच्या ओटीटी पदार्पणाविषयी जाणून कंगनाच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. कंगना एक रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. त्यानंतर त्यांचे चाहते खूप आनंदित आहेत. शो टेंप्टेशन आयलँडच्या भारतीय व्हर्जनसह कंगना ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. माध्यम अहवालांनुसार कंगनाने हा शो साईन केला असून, लवकरच त्याचे चित्रीकरण सुरू होईल.

काय असेल हा शो?

कपल आणि अविवाहित लोक टेम्प्टेशन आयलँड या शोमध्ये येतात, जिथे त्यांचे एकमेकांसोबातचे कनेक्शन, त्यांच्या जोडीदाराशी संबंधांची चाचणी केली जाते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंगनाच्या पदार्पणाविषयी जाणून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. कंगनाच्या चाहत्यांनी तिचा अभिनय नेहमीच पाहिला आहे. आता ती आपले होस्टिंग टॅलेंट देखील दाखवणार आहे.

धाकडच्या शूटिंगमध्ये व्यस्त

सध्या कंगना रनौत तिच्या आगामी चित्रपटाचे बुडापेस्टमध्ये शूटिंग करत आहे. नुकतेच तिने शूटिंगच्या ठिकाणाहून आपले फोटो शेअर केले. चित्रपटात कंगना एका एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे, जिचे नाव अग्नी असेल. या चित्रपटात कंगनाच्या सोबत अर्जुन रामपाल महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कंगनाकडे चित्रपटांची रांग

कंगना रनौतकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोना साथीच्या आजारामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय ती ‘धाकड’, ‘तेजस’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रासाठी कंगना बरीच तयारी करत आहे. नुकतेच तिने या लूकशी संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

(Kangana Ranaut OTT Debut with an Indian version of temptation Island)

हेही वाचा :

‘Miss you Raji…’ पती राज कौशलच्या आठवणींनी व्याकूळ झाली मंदिरा बेदी, शेअर केली भावनिक पोस्ट

Leander Paes Kim Sharma Affair | टेनिस स्टार लिएंडर पेसला डेट करतेय किम शर्मा, गोवा ट्रिपचे फोटो चर्चेत!

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...