AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कव्हर लाँच होताच करीना कपूरचा जलवा, पुस्तक बनले नंबर वन बेस्टसेलर!

बॉलिवूडची ‘ओजी क्वीन’ अशी ओळख असणारी करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीनाला तिच्या प्रत्येक स्टाईलसाठी चाहत्यांनी पसंती दिली आहे.

कव्हर लाँच होताच करीना कपूरचा जलवा, पुस्तक बनले नंबर वन बेस्टसेलर!
करीना कपूर-खान
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 4:33 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची ‘ओजी क्वीन’ अशी ओळख असणारी करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. करीनाला तिच्या प्रत्येक स्टाईलसाठी चाहत्यांनी पसंती दिली आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही करीना आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. अलीकडेच बॉलिवूड स्टारने तिचे पहिले पुस्तक ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ चे मुखपृष्ठ लाँच केले.

‘करीना कपूर खान खान्स प्रेग्नेन्सी बायबल’ चे कव्हर लाँचिंग नुकतेच झाले आणि amazon मधील प्रथम क्रमांकाचा बेस्टसेलर म्हणून हे पुस्तक ट्रेंडिंग झाले आहे. अभिनेत्रीचे पुस्तक काही तासांतच वेगाने पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाले.

करीना कपूरची चर्चा

दोन मुलांची आई बनलेल्या करीना कपूर खान हिने अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर आपल्या प्रेग्नसी मेमरीची घोषणा केली, ज्यात तिने आपल्या आई बनण्याच्या अनुभवाद्वारे सर्व मातांना मदत करण्यासाठी तिच्या दोन्ही गर्भधारणे दरम्यानच्या काही गोष्टी शेअर केल्या. करीनाने प्री-ऑर्डर लिंक शेअर करताच, देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

करीनाने शेअर केला व्हिडीओ

अलीकडेच करीना कपूर खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वयंपाकघरात उभी असल्याचे आणि नंतर बेकिंग ट्रेमधून तिचे पुस्तक बाहेर काढताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, हा माझा प्रवास आहे. माझी गर्भधारणा आणि माझे गर्भधारणा पुस्तक बायबल. मी कधी काम करण्यास उत्साही होते आणि कधी अंथरुणावरुन बाहेर पडणे देखील कठीण होते याबद्दल आणि माझ्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान मी माझ्या शारीरिक व भावनिक अनुभवांबद्दल लिहिले आहे, म्हणून हे पुस्तक माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.

करीना कपूर-खान सतत चित्रपटांमध्ये सक्रिय असते. दुसर्‍या मुलाच्या जन्मापूर्वी ही अभिनेत्री ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या सोबत अक्षय कुमार दिसला होता. करीना आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्माच्या अगदी आधीपर्यंत काम करत होती. आता, करीना कपूर ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर, ती करण जोहरच्या ‘तख्त’ मध्ये देखील दिसू शकते.

मीडियापासून लपवतेय बाळाचा चेहरा!

काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या लहान बाळाचा, तैमूर आणि सैफचा एक फोटो शेअर केला होता. परंतु, त्यामध्ये नवजात बाळाचा चेहरा दिसत नव्हता. करीना आणि सैफने धाकटा मुलाच्या जन्मापूर्वी निर्णय घेतला होता की, ते आपल्या धाकट्या मुलाला मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर ठेवतील. तैमूरप्रमाणेच आपल्या लहान मुलाने देखील चर्चेत यावे, अशी त्यांची इच्छा नाही.

जेव्हा जेव्हा तैमुर त्याच्या आई वडिलांसोबत बाहेर येतो तेव्हा छायाचित्रकार त्याचे फोटो काढायला लागतात. सुरुवातीला तैमूरला याचा खूप राग यायचा आणि कधीकधी तो फोटोग्राफरवरही चिडायचा, पण आता त्याला त्याची सवय झाली आहे. आता तो कॅमेरा पाहून हाय किंवा बायसुद्धा म्हणतो.

(Kareena Kapoor Pregnancy bible top seller book on social media)

हेही वाचा :

5G network Case | 20 लाखांचा दंड भरण्यास जुही चावलाची टाळाटाळ, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका तहकूब

किडनी फेल्युअरशी झुंज देतेय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री, आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे अवघड!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.