तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो अनेकदा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवतो आणि करोडो चाहत्यांची मने जिंकतो. अनेक नवे कलाकार अक्षय कुमारकडून अभिनेता होण्यासाठी प्रेरणा घेतात.

तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 2:03 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो अनेकदा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवतो आणि करोडो चाहत्यांची मने जिंकतो. अनेक नवे कलाकार अक्षय कुमारकडून अभिनेता होण्यासाठी प्रेरणा घेतात. चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला अक्षयसारखे व्हायचे आहे. पण अक्षय कुमारसारखा यशस्वी अभिनेता होणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. मात्र, यात थोडेसे कष्ट कमी होणार आहेत. आता अक्षय नवख्यांना ऑनलाईन अभिनय शिकवणार आहे.

अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, ‘जेव्हा मी अभिनेता होण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा आम्हाला औपचारिकपणे शिकण्याची संधी कधीच मिळाली नाही. पण, आता वेळ बदलली आहे. आता तुम्ही माझ्या व्यावसायिक मास्टर क्लासमध्ये उपस्थित राहू शकता आणि माझ्या 30 वर्षांच्या प्रवासातून काहीतरी शिकू देखील शकता.’

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

व्हिडीओमध्ये अक्षय म्हणतो की, ‘मी एक मेथड अभिनेता आहे का? मी नेहमीच माझे पात्र चांगले समजून घेतो. एका पात्रातून दुसर्‍या पात्रात जायला मला जास्त वेळ लागत नाही. म्हणून मी माझ्या स्वत:च्या मार्गाने जात आहे. हे माझे गणित आहे. मी बर्‍याचदा खऱ्या आयुष्यातून व्यक्तिरेखेतून प्रेरणा कशी घ्यावी याबद्दल विचार करतो. आपण केलेले छोटे-छोटे सीन्स आपल्याला आजीवन आठवतात. या सत्रात मी तुम्हाला माझ्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीविषयी सांगेन.’ अक्षय कुमार आणि राणा दग्गुबाती यांनी फेब्रुवारी 2021मध्ये त्यांच्या ऑनलाइन क्लासची माहिती दिली. दोघांनी मिळून हा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.

अक्षयकडे चित्रपटांची रांग!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर नुकताच अक्षयचा म्युझिक व्हिडीओ ‘फिलहाल 2’ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याने रिलीजच्या अल्पावधीतच त्याच्या नावे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. आता त्याचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर रिलीजची तारीख जाहीर केली होती. अक्षयबरोबर अभिनेत्री वाणी कपूर, लारा दत्ता या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या व्यतिरिक्त अक्षय ‘अतरंगी रे’, ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षयकडे सध्या चित्रपटांची रांगच लागली आहे.

(Akshay Kumar launches his own professional acting master class)

हेही वाचा :

Taapsee Pannu | ‘आऊटसायडर्स’साठी तापसी पन्नूचा खास प्लॅन, निर्माती बनून देणार नवी संधी!

RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.