Taapsee Pannu | ‘आऊटसायडर्स’साठी तापसी पन्नूचा खास प्लॅन, निर्माती बनून देणार नवी संधी!

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते. तिचे चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडतात. तापसीच्या चित्रपटांची कहाणी बऱ्याचदा हटके असते, त्यासाठी तिला खूप कष्ट देखील घ्यावे लागतात.

Taapsee Pannu | ‘आऊटसायडर्स’साठी तापसी पन्नूचा खास प्लॅन, निर्माती बनून देणार नवी संधी!
तापसी आणि प्रांजल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते. तिचे चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडतात. तापसीच्या चित्रपटांची कहाणी बऱ्याचदा हटके असते, त्यासाठी तिला खूप कष्ट देखील घ्यावे लागतात. बॉलिवूडमध्ये दशकाहून अधिक काळ काम केल्यानंतर आता तापसीने निर्माती बनण्याचा निर्णय घेतला आहे.

तापसी पन्नूने आज तिचे प्रॉडक्शन हाऊस ‘आऊटसायडर्स फिल्म्स’ लॉन्च केले आहेत. त्याबद्दल तिने’ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. या प्रोडक्शन हाऊससाठी तापसीने प्रांजल खांदडिया यांच्याशी हातमिळवणी केली आहे. प्रांजलने ‘सुपर 30’, ‘पीकू’, ‘सूरमा’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच, ती तापसीच्या ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाची निर्मिती करत आहे.

पाहा तापसी पन्नूची पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून तापसी मनोरंजन विश्वात नव्या कलागुण आणण्याची तयारी करत आहे. ती स्वत: बाहेरील असून आता बॉलिवूडमध्ये स्वत: ची वेगळी ओळख बनली आहे. आता ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून ‘आऊटसायडर्स’ना संधी देईल.

प्रॉडक्शन हाऊसचा आनंद!

आपल्या प्रोडक्शन हाऊसबद्दल तापसी पन्नू खूप उत्सुक आहे. तिने पीटीआयशी विशेष संभाषणात सांगितले की, ‘मला माहित होते की मी दिग्दर्शन करू शकत नाही. मी निर्मिती करू शकते. एक अभिनेत्री असल्याने मला अभिनयाची आवड आहे. मी सेटवर असते, तेव्हा मी इतर कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून आता माझ्याकडे एक भागीदार आहे, जी ही काम हाताळू शकेल आणि मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेन, मी माझे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करत आहे.’

तापसी पुढे म्हणाली की, ‘जेव्हा प्रांजलने मला तिच्याबरोबर भागीदारी करण्याविषयी विचारले तेव्हा मी अजिबात विचार केला नाही आणि थेट हो म्हणाले.’

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकताच तापसीचा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत ममेस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसले आहेत. याशिवाय ‘लूट लपेटा’, ‘रश्मी रॉकेट’, ‘शाबाश मिठू’ आणि ‘दोबारा’ या चित्रपटांमध्येही तापसी दिसणार आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी खूप परिश्रम घेत आहे.

(Taapsee Pannu launch her new production house Outsiders)

हेही वाचा :

RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!

रणरागिणीची यशोगाथा उलगडणाऱ्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’चा 500 भागांचा सुवर्ण टप्पा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI