AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसऱ्या दिवशीही बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, पाहा चित्रपटाचे कलेक्शन…

तीन वर्षांनंतर हृतिक रोशन चित्रपटामध्ये आगमन करत असल्याने हृतिकच्या चाहत्यांमध्ये विक्रम वेधा चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्षात पडद्यावर हृतिकला काही खास कामगिरी करण्यात यश मिळाले नाहीये.

'पोन्नियिन सेल्वन'चा दुसऱ्या दिवशीही बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, पाहा चित्रपटाचे कलेक्शन...
| Updated on: Oct 02, 2022 | 9:24 AM
Share

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विक्रम वेधा आणि पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज (Release) झाले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांची स्टोरी एकाच पुस्तकातून घेतलीये. मात्र, चित्रपट निर्मात्यांकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, जरी चित्रपटाची स्टोरी जरी एकाच पुस्तकातील असली तरीही पुस्तकाचे अनेक भाग आहेत. यामुळे दोन्ही चित्रपट (Movie) वेगळे आहेत आणि यामुळेच प्रेक्षकांनी दोन्ही पण चित्रपट बघावेत. विक्रम वेधाच्या माध्यमातून हृतिक रोशन तब्बल तीन वर्षांनंतर पडद्यावर दिसलाय.

तीन वर्षांनंतर हृतिक रोशन चित्रपटामध्ये आगमन करत असल्याने हृतिकच्या चाहत्यांमध्ये विक्रम वेधा चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्षात पडद्यावर हृतिकला काही खास कामगिरी करण्यात यश मिळाले नाहीये. निश्चितपणेच पोन्नियिन सेल्वन चित्रपट विक्रम वेधापेक्षा अधिक वरचढ पहिल्या दिवशीपासून ठरतोय. दोन्ही चित्रपटांचे दुसऱ्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले आहे.

दुसऱ्या दिवशीही पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच ठेवलाय. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने तब्बल 32.50 कोटींची कमाई केलीये. दोन दिवसांमध्ये चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर तब्बल 69.00 कोटींचे कलेक्शन केले आहे. आज रविवार असल्याने चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 500 कोटींचे बजेट लागले आहे.

हृतिक रोशनचा चित्रपट विक्रम वेधाची दुसऱ्या दिवशीची कामगिरी देखील निराशाजनक राहिलीये. दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर धमाका करता आला नाहीये. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर 12.75 कोटींचे कमाई केलीये. मात्र, हा आकडा 1 वाजेच्या दरम्यानचा होता. बाॅक्स ऑफिसवर हृतिक रोशनच्या चित्रपटाची जादू चालत नसल्याचे दिसत आहे.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...