Kriti Sanon Net Worth : एका चित्रपटासाठी तब्बल ‘इतकं’ मानधन आकारते क्रिती सेनॉन, कोटींच्या संपत्तीची मालकीण अभिनेत्री!

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रितीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

Kriti Sanon Net Worth : एका चित्रपटासाठी तब्बल ‘इतकं’ मानधन आकारते क्रिती सेनॉन, कोटींच्या संपत्तीची मालकीण अभिनेत्री!
क्रिती सेनॉन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 28, 2021 | 10:17 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रितीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत आणि अतिशय कमी वेळात तिने चाहत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. क्रितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपटाद्वारे केली होती. या सिनेमात ती अभिनेता महेश बाबू याच्या सोबत दिसली होती. तेलुगु इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी क्रिती आता बॉलिवूडवर राज्य करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण बनली आहे.

क्रितीने ‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. टायगर श्रॉफनेही तिच्यासोबत या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. तिच्या पहिल्या चित्रपटानंतर क्रितीने मागे वळून पाहिले नाही. आता देखील ती बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

क्रितीची कमाई

कॅकनॉलेज डॉट कॉमच्या अहवालानुसार क्रिती सेनॉन 29 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. अभिनय आणि ब्रँड अ‍ॅन्डोसेरमेंट्समधून क्रिती सर्वाधिक कमाई करते. तर, एका चित्रपटासाठी ती सुमारे 2 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती अनेक स्टेज शोदेखील करते. क्रितीचा ‘मिस टेकन’ नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील आहे.

रिपोर्ट्सनुसार, क्रिती सेनॉन जवळपास 15 ब्रँड्सचे समर्थन करते. ज्यामध्ये बाटा, अर्बन क्लॅप, फेम, टायटन रागासह अनेक ब्रँडचा समावेश आहे. वृत्तानुसार, ती ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेसमधून दरवर्षी सुमारे 2 कोटीं रुपयांची कमाई करते.

नव्या प्रोजेक्ट्सची रांग

क्रिती सेनॉनकडे याक्षणी अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. सोमवारी तिचा ‘मिमी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात क्रितीबरोबर पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. ‘आदि पुरुष’ या पॅन इंडिया चित्रपटामध्ये देखील क्रिती दिसणार आहे. या सिनेमात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रितीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट ठरणार आहे. क्रितीने काही काळापूर्वी ‘गणपत’ या चित्रपटातून आपला पहिला लूक शेअर केला होता.

(Kriti Sanon Net Worth the actress owns crores of rupees)

हेही वाचा :

अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, वयाच्या 40व्या वर्षीही सुंदर दिसते अभिनेत्री!

महेश बाबूसोबत मनोरंजन विश्वात एंट्री, ‘या’ चित्रपटांनी क्रिती सेनॉनने जिंकली प्रेक्षकांची मने!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें