Birthday Special Kriti Sanon : महेश बाबूसोबत मनोरंजन विश्वात एंट्री, ‘या’ चित्रपटांनी क्रिती सेनॉनने जिंकली प्रेक्षकांची मने!

बॉलिवूडची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘हीरोपंती’ या चित्रपटातून केली होती. आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.

Birthday Special Kriti Sanon : महेश बाबूसोबत मनोरंजन विश्वात एंट्री, ‘या’ चित्रपटांनी क्रिती सेनॉनने जिंकली प्रेक्षकांची मने!
Kriti Sanon
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 27, 2021 | 11:06 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘हीरोपंती’ या चित्रपटातून केली होती. आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत बऱ्याच मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही आजमितीला कृती सेनॉन हिंदी मनोरंजन विश्वाची एक सुपरस्टार आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्ली येथे झाला होता. दिल्ली येथे राहणार्‍या क्रिती सेनॉनने नोएडामधील महाविद्यालयातून बी.टेक केले आहे. या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली. सुपरस्टार महेश बाबूसोबत क्रिती सेनॉन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसली होती. यानंतर अभिनेत्रीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. चला तर जाणून घेऊया अभिनेत्रीचे पाच सर्वोत्कृष्ट चित्रपट…

राबता

‘राबता’ या चित्रपटात क्रिती सेनॉन सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत दिसली होती. या चित्रपटात क्रितीचे दोन लूक पाहायला मिळाले होते. वास्तविक हा चित्रपट पूर्वजन्मावर आधारित होता. अशा परिस्थितीत दोन जन्मांच्या कथांसह अभिनेत्रीही दोन भूमिकांमध्ये दिसली होती.

बरेली की बर्फी

18 ऑगस्ट 2017 रोजी रिलीज झालेला ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंत पडला होता. चित्रपटात क्रिती बिट्टी मिश्राच्या भूमिकेत दिसली होती. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील एका मुलीच्या भूमिकेत क्रिती दिसली होती. या चित्रपटात क्रितीसोबत आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव दिसले होते.

लुका छुपी

2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘लुका छुपी’मध्ये क्रिती चाहत्यांना नवीन अवतारात दिसली होती. ‘लुका छुपी’ची कथा मथुराच्या गुड्डूची (कार्तिक आर्यन) होती, जो रश्मीच्या (क्रिती सेनॉन) प्रेमात पडतो. लग्नाआधी रश्मी गुड्डूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल बोलते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो. हा चित्रपट कॉमेडी चित्रपट होता.

पानिपत

2019 मध्येच क्रितीचा ‘पानिपत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या मल्टीस्टारर चित्रपटात क्रिती सेनॉन ‘पार्वती बाईं’ च्या दमदार भूमिकेत दिसली. या चित्रपटात क्रितीच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. या चित्रपटात क्रिती घोड्यावर स्वार होण्यापासून युद्धापर्यंत सर्व काही करताना दिसली होती.

मिमी

आता क्रिती 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘मिमी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती मुख्य भूमिकेत दिसली आहे. क्रिती या चित्रपटात सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती अत्यंत आव्हानात्मक भूमिकेत दिसली आहे.

(Birthday Special Kriti Sanon Actress won the hearts of the audience with her film)

हेही वाचा :

Prathyusha Suicide | वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

उमेश कामत आणि मुक्ता बर्वेची ‘61 मिनिट्स’ रसिकांच्या भेटीला! घरबसल्या घेता येणार थरारनाट्याच्या अनुभव!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें