AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामा भाच्यामध्ये वाद, अखेर कृष्णा अभिषेक याने सोडले माैन, गोविंदाबद्दल केला मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये मोठा वाद सुरू आहे. कृष्णा अभिषेक याने गोविंदा याच्याबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर अनेकांनाच मोठा धक्का बसला होता. नुकताच कृष्णा अभिषेक याने मामासोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे.

मामा भाच्यामध्ये वाद, अखेर कृष्णा अभिषेक याने सोडले माैन, गोविंदाबद्दल केला मोठा खुलासा
| Updated on: Apr 10, 2023 | 4:02 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी एक मुलाखत गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahujaयांनी दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह यांना खडेबोल सुनावले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. गोविंदा आणि कृष्णा यांच्या नात्यामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. कृष्णावर मामी सुनिता हिने देखील थेट नाराजी व्यक्त केली. मात्र, आता यावर कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) याने मोठे भाष्य केले आहे.

गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये काहीतरी मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक आणि त्याची बहीण आरती सिंह यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये दोघांनीही लहानपणीचे काही किस्से सांगितले. मात्र, बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केला, जो मामा आणि मामीला अजिबातच आवडला नाही.

कृष्णा आणि आरती यांच्या मुलाखतीनंतर गोविंदा आणि सुनिता यांनी मुलाखत दिली. कृष्णा आणि आरती यांचे बोलणे ऐकून आम्हाला धक्का बसल्याचे देखील म्हटले. मामी सुनिता तर थेट म्हणाल्या की, ते असे का बोलले हेच आम्हाला कळाले नाहीये. कृष्णा अभिषेक म्हणाला होता की, दर महिन्याला मामा (गोविंदा) आम्हाला 2000 रूपये द्यायचे, याचाच राग गोविंदाला आणि त्याच्या पत्नीला आला.

कृष्णा अभिषेक सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मामा गोविंदा याच्यासोबत सुरू असलेल्या वादावर कृष्णा अभिषेक याला प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, जर माझी मामी माझ्यावर रागावली असेल तर मला वाटते ते खूप प्रेम आहे. हे सर्व कौटुंबिक प्रकरण आहे, हे सर्व प्रेम आहे. कृष्णा अभिषेक याच्या बोलण्याची आता चर्चा रंगताना दिसत आहे.

कृष्णा याने मामा आणि मामीसोबतच्या वादावर भाष्य करणे टाळले आणि हे सर्व प्रेम असल्याचे म्हटले आहे. एखाद्या विषयावरून ते माझ्यावर रागावले असतील तर ते फक्त आणि फक्त प्रेम असल्याचे म्हणताना कृष्णा अभिषेक हा दिसला. कृष्णा आणि आरती यांनी दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये लहानपणी त्यांच्या आयुष्यात नेमके काय काय घडत होते आणि मामा सुपरस्टार असतानाही ते कशाप्रकारचे हालाकीचे जीवन जगत होते हे सांगताना दिसले होते.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....