AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liger Box Office: ‘लायगर’ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला; विजय-अनन्याची केमिस्ट्री पडली फिकी?

मेट्रो आणि मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाची जेमतेमच कमाई झाली. शनिवारी आणि रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Liger Box Office: 'लायगर'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला; विजय-अनन्याची केमिस्ट्री पडली फिकी?
Liger Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 2:58 PM
Share

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘लायगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची (Liger Box Office Collection) सुरुवात ठीक झाली. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अनन्याच्या अभिनयावरून तिला ट्विटरवर ट्रोलदेखील करण्यात आलं. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत ‘लायगर’ने 5.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही फक्त हिंदी व्हर्जनची कमाई आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईबाबतची ही माहिती दिली. ‘लायगर’ हा विजयचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.

‘लायगर’ची कमाई-

गुरुवार (प्रिव्ह्यू शोज)- 1.25 कोटी रुपये शुक्रवार- 4.50 कोटी रुपये एकूण- 5.75 कोटी रुपये

मेट्रो आणि मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाची जेमतेमच कमाई झाली. शनिवारी आणि रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘लायगर’ प्रदर्शित होण्याआधी ट्विटरवर ‘बॉयकॉट लायगर’चा ट्रेंड होता. त्याचाही फटका कमाईला बसल्याची शक्यता आहे. ‘वर्ड ऑफ माऊथ’चाही वीकेंडच्या कमाईवर प्रभाव पडू शकतो.

विजयने 17 शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. या प्रत्येक शहरातील प्रमोशनच्या कार्यक्रमात विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. लायगरमध्ये विजय आणि अनन्यासोबतच रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन यांच्याही भूमिका आहेत. पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.