AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahima Chaudhary: महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर; ओळखणही झालं कठीण

या व्हिडीओत महिमाने तिला कर्करोगाचं निदान कसं झालं याबद्दल सांगितलं आहे. कॅन्सरचं निदान आणि उपचार यांबद्दल बोलताना ती भावूक झाली. तिच्या धैर्याबद्दल अनुपम खेर यांनी तिला 'हिरो' असं म्हटलं आहे.

Mahima Chaudhary: महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर; ओळखणही झालं कठीण
Mahima ChaudharyImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 09, 2022 | 1:29 PM
Share

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) हिला स्तनाच्या कर्करोगाचं (Breast Cancer) निदान झालं. गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी याबद्दलचा खुलासा केला. या व्हिडीओत महिमाने तिला कर्करोगाचं निदान कसं झालं याबद्दल सांगितलं आहे. कॅन्सरचं निदान आणि उपचार यांबद्दल बोलताना ती भावूक झाली. तिच्या धैर्याबद्दल अनुपम खेर यांनी तिला ‘हिरो’ असं म्हटलं आहे. महिमाने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट त्यावेळी तुफान गाजला. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

‘महिमा चौधरीच्या धैर्याची ही कथा आहे. जवळपास एक महिन्यापूर्वी अमेरिकेतून मी महिमाला फोन केला होता. माझ्या ‘द सिग्नेचर’ या 525व्या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मला तिच्याशी बोलायचं होतं. तिच्याशी बोलल्यानंतर मला समजलं की तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. महिमा ज्याप्रकारे कर्करोगाचा सामना करतेय, ते जगातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. कर्करोगाबद्दल सर्वांना सांगताना मी तिच्यासोबत राहावं अशी तिची इच्छा होती. पण महिमा.. तू खरंच हिरो आहेस. मित्रांनो, तुमचं प्रेम, आशीर्वाद तिला द्या. ती सेटवर परतली आहे आणि आता पुन्हा काम करण्यास सज्ज झाली आहे’, अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम यांनी तिला चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. तेव्हा महिमा त्यांना म्हणाली की तिला हा चित्रपट करायला आवडेल पण ते तिची वाट पाहू शकतील का? महिमाच्या या व्हिडीओमध्ये ती सुरुवातीला हसत बोलताना दिसते. पण कॅन्सरविषयी बोलताना ती रडू लागते. अनुपम हे तिला विचारतात की तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान कधी आणि कसं झालं? त्यावर महिमाने सांगितलं की तिला ब्रेस्ट कॅन्सरची कोणतीही लक्षणं नव्हती. ती दरवर्षी तिचं चेकअप करून घेत होती. अचानक एकेदिवशी चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी तिला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. बायोप्सी केल्यानंतर तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं. महिमाने या व्हिडिओमध्ये सांगितलं की, ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होतं, जे पूर्णपणे बरं होऊ शकतं.

महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर 2013 मध्ये महिमा आणि बॉबी विभक्त झाले. या दोघांना एरियाना ही मुलगी आहे. 2016 मध्ये ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटात महिमा शेवटची झळकली. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी