
मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते. अनेकदा जिमच्या बाहेर देखील मलायका अरोरा ही स्पाॅट होते. मलायका अरोरा हिचे वय 49 आहे. मात्र, मलायका अरोरा ही बोल्डनेसमध्ये 24 वर्षांच्या मुलींना मागे टाकते. मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. अरबाज खान (Arbaaz Khan) याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्यासोबत सुट्टया घालवण्यासाठी विदेशात गेली होती. अर्जुन कपूर याने अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.
अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या रिलेशनमुळे अनेकदा मलायका अरोरा हिच्यावर टिका केली जाते. अनेकदा टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना अर्जुन कपूर हा दिसतो. मलायका अरोरा ही तिच्या शोमध्ये अनेकदा मोठे खुलासे करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिच्या या शोला करण जोहर याने हजेरी लावली होती.
नुकताच मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही 24 वर्षांच्या मुलींसारखी आपल्या मित्रांसोबत धमाल करताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. चाहते सतत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना लग्न कधी करणार हे विचारताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, अजूनही मलायका अरोरा किंवा अर्जुन कपूर यांनी त्यांच्या लग्नावर काही भाष्य केले नाहीये.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुन कपूर याच्याबद्दल सांगताना मलायका अरोरा हिने मोठा खुलासा केला होता. मलायका अरोरा ही म्हणाली होती की, अर्जुन कपूर याला मी माझ्या स्वत: च्या हाताने तयार करून जेवण देते. कारण अर्जुन कपूर याला काहीच स्वयंपाक तयार करता येत नाही. स्वयंपाकच काय तर त्याला साधा चहा देखील तयार करता येत नाही. मलायका अरोरा आणि अजून कपूर हे कायमच सोबत स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वी हे गोव्याला देखील गेले होते.