Video | कॅमेरापासून बचाव करण्याच्या नादात ड्रेसचाही पडला विसर! मौनी रॉय Oops Momentची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या कामाव्यतिरिक्त तिच्या आउटफिट्स आणि अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील चर्चेत असते. रीलीव्हिंग ड्रेस परिधान केल्याने सेलिब्रिटींना अनेकदा चर्चेत राहण्यास मदत होते. परंतु, काहीवेळा हेच ड्रेस त्यांच्यासाठी समस्या बनतात.

Video | कॅमेरापासून बचाव करण्याच्या नादात ड्रेसचाही पडला विसर! मौनी रॉय Oops Momentची शिकार
Mouni Roy

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या कामाव्यतिरिक्त तिच्या आउटफिट्स आणि अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील चर्चेत असते. रीलीव्हिंग ड्रेस परिधान केल्याने सेलिब्रिटींना अनेकदा चर्चेत राहण्यास मदत होते. परंतु, काहीवेळा हेच ड्रेस त्यांच्यासाठी समस्या बनतात. अनेक दिग्गज सेलिब्रिटी रीलीव्हिंग आऊटफिट परिधान करण्याच्या नादात Oops Momentला बळी पडले आहेत आणि मौनी रॉय देखील त्यातून सुटलेली नाही.

अभिनेत्रीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती पापाराझींपासून वाचण्यासाठी धावत कारमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. मात्र, इथेही फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग केला आणि ती कारमध्ये बसली असताना तिचा ड्रेस अचानक जास्त घसरला आणि ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय हि Oops Momentची शिकार झाली.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

Oops मोमेंटला बळी पडलेली मौनी रॉय हा बॅकलेस ड्रेस परिधान करून एका ठिकाणी गेली होती. तिथे तिने थेट तिच्या चाहत्यांची भेट घेतली आणि या ड्रेसमधील तिचे फोटोही समोर आले. पण, जेव्हा तिचा हा व्हिडीओ समोर आला, तेव्हा लोकांनी लगेच शेअर केला. मौनी रॉयसोबत असा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. याआधीही तिच्यासोबत अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत.

मौनी रॉयच्या यशाचा चढता आलेख

आतापर्यंत छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर मौनी आता सलग रुपेरी पडद्यावरचे प्रोजेक्ट करत आहे. 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी रॉय आजही ‘तुम बिन 2’, ‘गोल्ड’ आणि ‘मेड इन चायना’ या चित्रपटांसाठी विशेष ओळखली जाते. मौनी आता ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

लवकरच अडकणार लग्नबंधनात!

मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत आहे. बर्‍याच काळापासून मौनी रॉय दुबई स्थित बँकर सूरज नंबियार (suraj nambiar) याला डेट करत होती आणि आता लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 11:47 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI