Kamaal R. Khan | केआरकेच्या जामीन अर्जावर या दिवशी होणार सुनावणी, वकिल नेमके काय म्हणाले वाचा सविस्तर…

ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले की, केआरके बॉलीवूड कलाकारांना टार्गेट करतो आणि त्याच्यांवर वादग्रस्त ट्विट करून समाजातील दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करतो. आपली बाजू मांडत पोलिसांनी केआरकेची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली, जी न्यायालयाने मान्य केली.

Kamaal R. Khan | केआरकेच्या जामीन अर्जावर या दिवशी होणार सुनावणी, वकिल नेमके काय म्हणाले वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 11:58 AM

मुंबई : कमाल रशीद खान (Kamaal R. Khan) आणि वाद हे समिकरण काही नवीन नाहीयं. कमाल रशीद खान म्हणजेच केआरके कायमच वादाच्या भोवऱ्यात असतात. 2020 मध्ये केलेल्या एका ट्विट प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विमानतळावर केआरकेला अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना बोरिवली न्यायालयात (Court) हजर करण्यात आले, तेथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. काल केआरकेचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यावर पुढील महिन्यात 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी

ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले की, केआरके बॉलीवूड कलाकारांना टार्गेट करतो आणि त्याच्यांवर वादग्रस्त ट्विट करून समाजातील दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करतो. आपली बाजू मांडत पोलिसांनी केआरकेची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली, जी न्यायालयाने मान्य केली. मात्र, केआरकेच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

जामीन अर्जावर 2 सप्टेंबरला होणार सुनावणी, सर्वांचे लक्ष निकालाकडे

केआरकेने केलेले ट्विट अक्षय कुमार, राम गोपाल वर्मा, इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल होते, परंतु त्यापैकी कोणीही केआरकेविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. वकिलांचे म्हणणे आहे की, केआरकेविरुद्ध एफआयआर आणखी एका व्यक्तीने दाखल केला आहे. केआरकेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हा त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 2 सप्टेंबरला ठेवली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.