Video: राज कपूर यांची होळी पार्टी कशी असायची? पहा नीतू कपूर यांनी शेअर केलेला हा खास व्हिडीओ

Video: राज कपूर यांची होळी पार्टी कशी असायची? पहा नीतू कपूर यांनी शेअर केलेला हा खास व्हिडीओ
Raj Kapoor Holi Party
Image Credit source: Instagram

होळी म्हटलं की बॉलिवूडच्या पार्ट्यांचा (Holi parties) आवर्जून उल्लेख केला जातो. आजही बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार होळी पार्ट्यांचं आयोजन करतात. दिवंगत अभिनेते राज कपूर यांची होळी पार्टी इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध असायची.

स्वाती वेमूल

|

Mar 18, 2022 | 3:00 PM

देशभरात अत्यंत उत्साहात धुळवड साजरी केली जात आहे. रंगांची उधळण करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही बरेच फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. होळी म्हटलं की बॉलिवूडच्या पार्ट्यांचा (Holi parties) आवर्जून उल्लेख केला जातो. आजही बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार होळी पार्ट्यांचं आयोजन करतात. दिवंगत अभिनेते राज कपूर यांची होळी पार्टी इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध असायची. या पार्टीची आठवण आजही केली जाते. आर. के स्टुडिओमध्ये पार पडणाऱ्या या पार्टीत मोठमोठे स्टार्स सहभागी होत असत. यासोबतच इंडस्ट्रीतील नवोदित कलाकारही या पार्टीत जाण्यासाठी उत्सुक होते. खुद्द राज कपूर (Raj Kapoor) यांना होळी खेळण्याची खूप आवड होती. त्यांच्या याच होळीच्या पार्टीचा एक व्हिडीओ नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी त्या सुवर्ण आठवणींना उजाळा दिला आहे.

या पार्टीत प्रत्येकाला रंगीत पाण्यानं भरलेल्या मोठमोठ्या ट्यूबच्या टबात बिनधास्त ढकललं जायचं. त्यानेच या व्हिडीओची सुरुवात होते. या व्हिडीओमध्ये राज कपूर हे त्यांच्या कुटुंबीयांसह वेळ घालवताना पहायला मिळत आहेत. त्यांची पत्नी कृष्णा, शम्मी कपूर यांची पत्नी नीला देवी यासुद्धा व्हिडीओत दिसत आहेत. नीतू कपूर यांच्या मांडीवर मुलगा रणबीर कपूर बसला आहे. तर ऋषी कपूरही होळी खेळण्यात व्यस्त आहेत. राज कपूर यांचा डान्सही यामध्ये पहायला मिळतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

कपूर कुटुंबीयांची होळी पार्टी पाहून चाहतेसुद्धा या व्हिडीओवर व्यक्त झाले. ‘सुंदर आठवणी’ असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्याने आर. के. स्टुडिओतील गणेशोत्सवाचीही आठवण सांगितली. राज कपूर यांचं 1988 मध्ये निधन झालं. राज कपूर यांची नात करिश्मा कपूरनेही इंस्टाग्रामवर होळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

हेही वाचा:

‘Jhund’ आणि ‘The Kashmir Files’ने समाजात दोन गट पाडले? नागराज मंजुळे म्हणतात..

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें