Nora Fatehi | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोरा फतेही हिचे पाय खोलात? ईडी कार्यालयात चाैकशी

| Updated on: Dec 02, 2022 | 3:34 PM

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून आहे. इतकेच नाही तर ईडीने जॅकलीनचा पासपोर्ट देखील जप्त केलाय.

Nora Fatehi | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोरा फतेही हिचे पाय खोलात? ईडी कार्यालयात चाैकशी
Follow us on

मुंबई : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही हिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. सुकेश याने नोराला महागडे गिफ्ट दिले आहेत. फक्त जॅकलीन आणि नोराच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री या सुकेशच्या संपर्कात होत्या. पीटीआयच्या रिपोर्टनुसार मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात नोरा फतेहीची जबानी नोंदवण्यासाठी आज शुक्रवारी ती ईडीच्या कार्यालयात हजर झालीये. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोरा फतेहीचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून आहे. इतकेच नाही तर ईडीने जॅकलीनचा पासपोर्ट देखील जप्त केलाय. जॅकलीन भारत सोडून जाण्याच्या तयारीत असल्याने हे मोठे पाऊल ईडीकडून उचण्यात आले.

इतकेच नाही तर अनेक बाॅलिवूड अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी जेलमध्ये देखील गेल्या होत्या. जॅकलीनला सुकेशने अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुकेशने जेलमधून एक पत्र लिहिले होते.

सुकेशने आपल्या पत्रामध्ये हे स्पष्ट सांगितले होते की, माझ्या कुठल्याही पैशांबद्दल जॅकलीनला माहिती नव्हती. मी कोणत्या मार्गाने पैसे कमवत आहे, हे देखील तिला माहिती नव्हते. तिने माझ्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा केली होती.

जॅकलीन फर्नांडिस सुकेशच्या प्रेमात इतके जास्त आंधळी झाली होती की, तिला सुकेशसोबत लग्न देखील करायचे होते. फिफा वर्ल्ड कप 2022 मुळे नोरा फतेही वादात सापडलीये. फिफा फॅनफेस्टमध्ये नोरा फतेही हिने स्टेजवर धमाकेदार डान्स केला.

एका चाहत्याने नोराचा डान्स झाल्यानंतर मंचावर तिरंगा दिला. त्यानंतर नोराने एखाद्या रूमालासारखा तिरंगा पकडून गुंडाळला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वचजण तिरंग्याचा अपमान केल्यामुळे नोरावर टीका करत होते. मात्र, अजूनही याप्रकरणी नोराने माफी मागितली नाहीये.