शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, जबाब नोंदवण्यासाठी कंगना रनौत पोलिस ठाण्यात हजर!

कृषी कायदा मागे घेण्याच्या मुद्द्यावरून, कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी लिहिल्याबद्दल देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला गेला होता आणि या प्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, जबाब नोंदवण्यासाठी कंगना रनौत पोलिस ठाण्यात हजर!
Kangna Ranaut
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 12:39 PM

मुंबई : शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये कलम 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंगना बुधवारी तिचा जवाब नोंदवण्यासाठी येणार होती. मात्र, ती मुंबई पोलिसांसमोर जवाब नोंदवण्यासाठी आली नाही आणि पोलिसांनी सूट देण्याची मागणी करत नवीन तारीख मागितली होती. पण, पोलिसांतर्फे तिला काहीही उत्तर देण्यात आले नाही, त्यानंतर आज ती आज  आपले म्हणणे नोंदवण्यासाठी खार पोलीस स्टेशन पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, कृषी कायदा मागे घेण्याच्या मुद्द्यावरून, कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी लिहिल्याबद्दल देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला गेला होता आणि या प्रकरणी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कंगनाची प्रतिक्रिया वादात!

सरकारने कृषी कायदा मागे घेतल्यानंतर संतप्त कंगनाने सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात टीका केली होती. या पोस्टमध्ये तिने अनेक वादग्रस्त गोष्टी लिहिल्या होत्या. यानंतर ती ट्रोलही झाली होती. यापूर्वी तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ असेही संबोधले होते. तसेच, अनेक अपशब्द वापरले होते.

एफआयआर दाखल झाला!

कंगनाच्या पोस्टनंतर दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने एफआयआर दाखल केला होता. समितीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांनी कंगनाच्या विरोधात मंदिर मार्ग पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर, शीख समाजाच्या भावना दुखावण्यासाठी त्यांनी ती पोस्ट जाणूनबुजून तयार केली होती. कंगनाच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.

कंगनाकडे चित्रपटांची रांग

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रनौतकडे सध्या चित्रपटांची रांग आहे. तिचा ‘तेजस’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘धडक’, ‘इमर्जन्सी’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनयासोबतच कंगना चित्रपटांची निर्मितीही करत आहे. अभिनेत्री अवनीत कौर तिच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

काही काळापूर्वी कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कंगनाच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. ‘थलायवी’ हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. अभिनय ते राजकारण असा त्यांचा कारकिर्दीचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.