AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घनदाट केस गायब झाले अन् टक्कल पडलं… विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद

Alopecia Areata : विल स्मिथच्या कृतीबद्दल आणि त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी खूप चर्चा झाली. तिला अ‍ॅलोपेसिया हा आजार आहे. हा आजार नेमका काय आहे? या विषयी जाणून घेऊयात...

घनदाट केस गायब झाले अन् टक्कल पडलं... विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद
विल स्मिथ आणि जेडा पिंकेट
| Updated on: Mar 29, 2022 | 7:00 PM
Share

मुंबई : जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची (Will Smith) सूत्रसंचालक क्रिस रॉक (Chris Rock) याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची (Jada Pinkett Smith ) खिल्ली उडवली. जेडाच्या टकलावरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली. या सगळ्या प्रकारानंतर विल स्मिथच्या कृतीबद्दल आणि त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी खूप चर्चा झाली. तिला अ‍ॅलोपेसिया (Alopecia Areata) हा आजार आहे. हा आजार नेमका काय आहे? या विषयी जाणून घेऊयात…

अभिनेता विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेटला अ‍ॅलोपेसिया नावाचा आजार आहे. या आजारामुळे तिचे केस गळतात. 2018 मध्ये पहिल्यांदा ती याविषयी बोलली होती. तिच्या या आजाराविषयी अनेकांना प्रश्न आहेत.

‘अ‍ॅलोपेसिया एरिटा’ हा आजार नेमका काय आहे?

अ‍ॅलोपेसिया एरिटा हा आजार तुमच्या केसांवर सर्वाधिक परिणाम करतो. या आजारामुळे केस गळण्यास सुरूवात होते. या आजारात केसांच्या मुळांवर सर्वप्रथम हल्ला होतो.यामुळे केस झपाट्याने तुटतात आणि त्यामुळे टक्कल पडू लागतं. काहींच्या भुवयांवरचेही केस गळू लागतात. तसंच काहींच्या पापण्या आणि चेहऱ्यावरच्या केसांच्या बाबतीतही ही समस्या जाणवते.

आपल्याला अ‍ॅलोपेसिया एरिटा आहे का हे कसे ओळखावं?

केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे सुरूवातीला या आजाराच्या रुग्णांना याची गंभीरता लक्षात येत नाही. पण नंतर-नंतर ही केसगळती अधिक गंभीर रूप धारण करते आणि मग टक्कल पडू लागतं. केस गळलेल्या ठिकाणी खाज सुटते आणि जळजळ सुरू होते. उपचारानंतर हा आजार बरा होऊ शकतो. पण काही काळानंतर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो.

RRRवरून आलियाचं राजामौलींसोबत वाजलं; रागाच्या भरात डिलिट केले चित्रपटाचे सर्व पोस्ट

Locha Jhala Re On OTT : अंकुश, सिद्धार्थ आणि वैदेहीचा ‘लोच्या झाला रे’ सिनेमा ओटीटीवर येणार, ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार

हेलिकॉप्टरच्या पंख्याची फडफड आणि लाखो मुलींच्या हृदयाची धडधड एकाचवेळी… पाहा विजय देवरकोंडाचे एक्सक्लुझिव्ह फोटो

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.