Pooja Hegde : पूजा हेगडेची ‘हॉट’ झलक, बिकिनीची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकीत!
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती मालदीव(Maldives)मधले फोटो शेअर करतेय. तिनं तिचा आणखी एक फोटो इन्स्टावर (Instagram) पोस्ट केलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती मालदीव(Maldives)मधले फोटो शेअर करतेय. चाहत्यांनाही तिचा हा हटके अंदाज भावलाय. आता तिनं तिचा आणखी एक फोटो इन्स्टावर (Instagram) पोस्ट केलाय. फोटोतली पूजाची बोल्ड स्टाइल पाहून चाहते भलतेच खूश झालेत.
इन्स्टावर लाइक्सची बरसात फोटोमध्ये पूजा हेगडे ब्लॅक अँड व्हाइट क्रोशेट बिकिनी घातलेली दिसतेय. तिचे केस हातांत धरून ती कॅमेऱ्यासमोर परफेक्ट फिगर दाखवतेय. पूजाने घातलेल्या बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या बिकिनीची किंमत जवळपास 6 हजार रुपये आहे. हा फोटो पूजानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याला प्रचंड लाइक्स मिळतायत. तिचे फॉलोअर्स फोटो शेअरही करतायत. कमेंट बॉक्समध्ये तर चाहते भरभरून प्रतिक्रिया देतायत. या फोटोला 1,371,873+लाइक्स मिळालेत.
View this post on Instagram
आधीही शेअर केलेत बोल्ड फोटो पूजा हेगडे नुकतीच मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. तिथून तिनं तिचं अनेक बिकिनी फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंमध्ये तिनं तिची परफेक्ट फिगर दाखवलीय. पूजा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. चाहत्यांनाही ते फोटो आवडतात.
बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहे. सध्या तिचा नवीन चित्रपट ‘राधे श्याम’ चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटातला पूजा हेगडेचा लूक शेअर करण्यात आला होता. याशिवाय नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला, ज्याला करोडो व्ह्यूज मिळालेत. पूजा हेगडेनं आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेंजो दारो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.