Video | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट! ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं?

Video | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट! ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं?
लता मंगेशकर

Lata Mangeshakar Health Update : लत्ता दीदींना 9 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 22, 2022 | 8:50 PM

मुंबई : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीवरुन चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच लता मंगेशकर यांच्या अधिकृत इन्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. सध्या लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कॅन्डी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सध्या आयसीयूत दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कृपा करुन लतादीदींच्या प्रकृतीबद्दल गैरसमज पसरवू नये, असं आवाहन डॉक्टरांनी या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केलं आहे. डॉक्टर प्रतित सामदानी यांनी लता मंगेशकर यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही पोस्ट केली आहे.

काय म्हटलं पोस्टमध्ये?

आम्ही तुम्हाला चुकीची माहिती न पसरवण्याची कळकळीची विनंती करतो आहेत. कृपा करुन चुकीच्या बातम्या पसरवणं थांबवा, असं आवाहन या इन्स्टाग्राम पोस्टमधून करण्यात आलं आहे. आधीपेक्षा लतादीदी आता उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्या सध्या अंडर ऑबझर्वेशन असून त्यांच्यावर आयसीयूत त्यांच्यावर उपाचर सुरु आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परततील, अशी आपण सगळ्यांनीच प्रार्थना करुयात.

लत्ता दीदींना 9 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. पण काही समाजकंटकांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत, अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. त्या लवकर ब-या होण्यासाठी पार्थना करा असं एका पोस्टमध्ये अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनीही नुकतचं म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

दीदींच्या प्रकृतीत सुधारणा

लत्ता दीदींचं वय 92 वर्षे आहे. त्यांची तब्येत सुधारणी असून त्यांनी ठोस अन्न खाण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगली सुधारणा दिसून येत असून त्या सद्या व्हेंटिलेटरवर नाहीत. डॉ प्रतित समदानी आणि इतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता मंगेशकर यांच्या आरोग्याचे अपडेट्स रुग्णालयातील डॉक्टर जारी करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांकडून लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स दिले जात आहेत. सद्या त्यांची ‘लताजींची प्रकृती आता ठीक आहे. डॉक्टर बोलतील तेव्हा त्यांना घरी आणले जाईल.

संबंधित बातम्या :

लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘10’ विस्मयकारक गोष्टी!

जेव्हा लतादीदी संगीतकार चित्रगुप्त यांना म्हणाल्या, ‘चपलेवर भरोसा आहे, माझ्या आवाजावर नाही?’, वाचा संगीतमय किस्सा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें