‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी प्रभास चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट, सोशल मीडियावरून दिली हिंट!

'व्हॅलेंटाईन डे' दिनी प्रभास चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट, सोशल मीडियावरून दिली हिंट!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'राधे श्याम' चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 12, 2021 | 1:19 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत. 2018 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटासंबंधीत एक अपडेट शेअर केले आहे. 14 फेब्रुवारीला चित्रपटाची एक झलक चाहत्यांना बघायला मिळणार आहे.  (Prabhas will give a big gift to the fans on ‘Valentine’s Day’)

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता. टीझरची सुरूवात प्रभासच्या बाहुबली लूकपासून झाली होती त्यानंतर ‘साहो’ चित्रपटाचा एक सीन ज्यामध्ये प्रभास रस्त्यावर फिरताना दिसत होता. या चित्रपटाचे शॉर्ट प्री टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले होते की, संपूर्ण टीझर 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे संगीत जस्टिन प्रभाकरण यांनी केले आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते.

संबंधित बातम्या : 

तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर….

शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

योगी भेटीचा अक्षयकुमारला फटका? ठाकरे सरकारची वक्रदृष्टी?; ‘सूर्यवंशी’चं काय होणार?

(Prabhas will give a big gift to the fans on ‘Valentine’s Day’)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें