
मुंबई : प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनंतर भारतामध्ये परतली आहे. प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती मुंबई विमानतळावर दिसत आहे. भारतामध्ये परतल्याचा आनंद प्रियांकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही तर प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवरही याचे काही फोटो शेअर केले असून मुंबई मेरी जान…असेही प्रियांकाने म्हटले आहे. प्रियांका जरी भारतामध्ये राहत नसेल तरीही विदेशात देखील सर्व भारतीय सण उत्सव प्रियांका साजरे करते.
प्रियांका चोप्रा जगाच्या कोणत्याही कोणात असो ती आपल्या चाहत्यांसाठी सर्व माहिती शेअर करते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियांका चोप्राने नेव्ही ब्लू कलरच्या ड्रेस घातला आहे. प्रियांकाच एकदम ग्लॅमरस लूक दिसतोय. प्रियांकाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे चाहते या व्हिडीओवर कमेंट मोठ्या प्रमाणात करत आहेत.
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने फ्लाइटच्या खिडकीतून एक फोटो क्लिक केला आहे आणि लिहिले आहे ‘Back In The Bay… TouchTown’. दुसऱ्या फोटो शेअर करताना त्यावर लिहिले की, मुंबई मेरी जान…इतकेच नाही तर प्रियांकाने मुंबईमधील रस्ताचाही एक फोटो शेअर केलाय. हा फोटो विमानतळावरून घरी जात असतानाचा दिसतोय.
प्रियांकाचा विमानतळावरील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती एकटीच दिसत आहे. यामुळे अनेक युजर्सने कमेंट करत मुलगी मालती कुठे असल्याचा प्रश्न देखील केलाय. प्रियांका मुलीला घेऊन देखील भारतामध्ये आलीये, असे सांगितले जात आहे. मात्र, व्हिडीओमध्ये मालती दिसत नाहीये.