साजिद खान याच्या समर्थनार्थ राखी सावंत मैदानात, म्हणाली की माझ्या भावाला…
दररोज साजिद खानवर शर्लिन चोप्रा वेगवेगळे आरोप करताना दिसत आहे. साजिद खान विरोधात सोशल मीडियावरही शर्लिनने मोहिम सुरू केलीये.

मुंबई : बिग बॉसच्या घरात साजिद खान दाखल झाल्यापासून बाहेर मोठा हंगामा सुरू आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने साजिद खान विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. दररोज साजिद खानवर शर्लिन चोप्रा वेगवेगळे आरोप करताना दिसत आहे. साजिद खान विरोधात सोशल मीडियावरही शर्लिनने मोहिम सुरू केलीये. अनेक अभिनेत्रींनी पुढे येत साजिद खानच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. इतकेच नाही तर या वादामध्ये शर्लिनने बिग बाॅसच्या निर्मात्यांवर आणि सलमान खान याच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यापासून MeToo च्या आरोपामुळे वादात सापडला आहे. सातत्याने साजिद खानचे प्रकरण चिघळत असताना बाॅलिवूडमधील अनेक कलाकार साजिद खानच्या पाठिशी उभे असल्याचे देखील चित्र बघायला मिळतंय. अनेकांनी साजिद खानचे समर्थन केले आहे.
View this post on Instagram
साजिद खानच्या समर्थनार्थ चक्क आता राखी सावंत मैदानात उतरलीये. इतकेच नाही तर मीडियासोबत बोलताना राखी सावंत हिने शर्लिन चोप्रावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. राखी म्हणाली की, ही शर्लिन चोप्रा कधी राज कुंद्रावर तर कधी माझा भाऊ साजिद खान यांच्यावर आरोप लावते. पोलिसांना पण समजले की, हे सर्व खोटे आहे.
साजिद खान निर्दोष आहे. त्याच्या विरोधात पोलिसात कोणीही आले नाही, कोणीही त्याच्याविरुद्ध साक्ष दिली नाही. खोटे आरोप लावताना शर्लिनला लाज वाटत नाही का? असेही राखी सावंत म्हणाली. यावेळी बोलताना राखी सावंतने अनेक आरोप शर्लिनवर केले. आता यावर शर्लिन काय उत्तर देते हे बघण्यासारखे ठरणार आहे.
