Pushpa Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने नवीन वर्षात केला नवा रेकॉर्ड! पाहा किती कोटींचा गल्ला जमवला…

Pushpa Box Office Collection : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ने नवीन वर्षात केला नवा रेकॉर्ड! पाहा किती कोटींचा गल्ला जमवला...

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' चित्रपट नवीन वर्षात एक नवीन जादू करताना दिसत आहे. वर्षाअखेरीस प्रदर्शित झालेला साऊथचा हा चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, तर देशाच्या प्रत्येक भागात जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनने सर्व ट्रेड पंडितांना आश्चर्यचकित केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jan 03, 2022 | 3:55 PM

मुंबई : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट नवीन वर्षात एक नवीन जादू करताना दिसत आहे. वर्षाअखेरीस प्रदर्शित झालेला साऊथचा हा चित्रपट केवळ दक्षिणेतच नाही, तर देशाच्या प्रत्येक भागात जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनने सर्व ट्रेड पंडितांना आश्चर्यचकित केले आहे. हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे तर, ‘पुष्पा’ रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात या वर्षातील सर्वात मोठ्या रिलीज झालेल्या ’83’ चित्रपटाच्या कलेक्शनला टक्कर देताना दिसत आहे. आजमितीला ‘पुष्पा’ तीच करत आहे, जी 2015 मध्ये राजामौलींच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने केली होती.

पुष्पाने पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात जवळपास 166 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर, ‘स्पायडरमॅन’, ’83’सोबत स्पर्धा देऊनही, ‘पुष्पा’नेबॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. याने केवळ दक्षिणेतच नाही, तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आश्चर्यकारक कमाई केली आहे. या चित्रपटाने हिंदीत जवळपास 56.69 कोटींची कमाई केली आहे. आता तो 75 कोटींच्या जवळपास पोहोचत आहे. दररोज त्याच्या कमाईत मोठी झेप पाहायला मिळत आहे.

हिंदीत ‘पुष्पा’चा स्क्रीन काउंट वाढवला जात असल्याची बातमी चर्चेत होती. याचाच परिणाम असा झाला की, या चित्रपटाने तिसर्‍या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत 6.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून लिहिले की, ‘पुष्पा’ने 16व्या दिवशी सर्वोच्च कमाई केली.’ यापूर्वी त्याने हिंदीत एका दिवसात इतकी कमाई केली नव्हती. या चित्रपटाचे पदार्पण खूपच संथ होते कारण त्याला हिंदीत फार कमी स्क्रीन मिळाल्या होत्या.

आणखी धामाक्याचा अंदाज!

पुष्पाने तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी 3.50 कोटी आणि शनिवारी दुसऱ्या दिवशी 6.10 कोटी कमाई करून, एकूण 56.69 कोटी रुपये कमवले आहेत. लवकरच तो 75 कोटींचा आकडा गाठेल, अशी अपेक्षाही चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अल्लू अर्जुनही या कमाईने खूप खूश आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट एका चंदन तस्करावर आधारित आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन स्मगलरच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला असून, अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाने आणि संवादफेकीने सर्वांची मने जिंकली आहेत. यासोबतच रश्मिकाही लोकांच्या अपेक्षांवर खरी उतरली आहे. यावेळी तिची वेगळी स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय या चित्रपटात मल्याळम चित्रपट स्टार फहाद फासिल देखील आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत बनवला गेला आहे पण तो जगभरात हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें