AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant Video : राहुल वैद्य आणि दिशाच्या लग्नाची धूम, राखी सावंत म्हणते ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं हं’

राखीनं शेवटी सांगितलं की तिचं लग्न होईल, त्यानंतर सर्व चाहते गोंधळात पडले आहेत कारण राखीनुसार ती विवाहित आहे आणि नवरा परदेशात राहतो. (Rahul Vaidya and Disha Parmar's wedding fun, Rakhi Sawant says 'Next year you all come to my wedding')

Rakhi Sawant Video : राहुल वैद्य आणि दिशाच्या लग्नाची धूम, राखी सावंत म्हणते 'पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं हं'
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई : या आठवड्यात राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिशा परमार (Disha Parmar) यांचं लग्न चर्चेत होतं. शुक्रवारी दोघांनीही लग्नगाठ बांधली आणि शनिवारी लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली. शनिवारी झालेल्या पार्टीत बिग बॉसमधील (Bigg boss) त्याचे मित्र सहभागी झाले होते, त्यातीलच एक म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant). तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या राखीनं राहुल आणि दिशासाठी ती कोणतं गिफ्ट घेतेय हे सांगितलं.

पहिल्या व्हिडीओमध्ये राखीनं गाणं गायलं आहे, राहुलकी बारात, दिशा के रंगीले होंगे हाथ, मगन राखी नाचेगी.

पाहा व्हिडीओ (See Video)

यानंतर राखी म्हणते की ‘राहुल लग्नासाठी अभिनंदन…मी दिशासाठी हा सुंदर गळ्यातील सेट घेतला आहे. पुढच्या वर्षी तुम्ही सर्व माझ्या लग्नाला या. व्हिडीओ शेअर करत राखीनं लिहिलं की, अशा प्रकारे मी माझा मित्र राहुलच्या लग्नाचा आनंद लुटत आहे.

‘पुढच्या वर्षी तुम्ही सर्व माझ्या लग्नाला या…’ चाहते गोंधळात

बाकी सर्व काही ठीक आहे, मात्र राखीनं शेवटी सांगितलं की तिचं लग्न होईल, त्यानंतर सर्व चाहते गोंधळात पडले आहेत कारण राखीनुसार ती विवाहित आहे आणि नवरा परदेशात राहतो. मात्र राखीनं अद्याप पतीचा फोटो दाखवलेला नाही किंवा तो अद्याप कोणासमोर आला नाही.

राखीच्या लग्नावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, त्याविषयी बोलताना राखीनं एका मुलाखतीत सांगितलं की तिनं आपल्या आईची शपथ घेतली आहे की तिनं लग्न केलं आहे.

व्यावसायिक जीवन

राखीच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तिचं ‘मेरे ड्रीम में तेरी एंट्री’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. गाण्यात राखीच्या जबरदस्त डान्स मूव्हजनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. इतकेच नाही तर राखीचं हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवरही जोरदार व्हायरल होत आहे. राहुलच्या लग्नातही राखीनं या गाण्यावर डान्स केला.

संबंधित बातम्या

Couple Goals : आयरा खानची रोमँटिक पोस्ट, बॉयफ्रेन्ड नुपूर शिखरेसोबतचे खास फोटो शेअर

Fatima Shaikh : पिंजऱ्यात बंद फातिमा सना शेखचा हॉट लूक, इंस्टाग्रामवर चाहते घायाळ

लव्हबर्ड्स कतरिना कैफ-विक्की कौशल लवकरच विवाह बंधनात अडकणार? सलमानच्या स्टायलिस्टने दिले संकेत!

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.