लव्हबर्ड्स कतरिना कैफ-विक्की कौशल लवकरच विवाह बंधनात अडकणार? सलमानच्या स्टायलिस्टने दिले संकेत!

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) या सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

लव्हबर्ड्स कतरिना कैफ-विक्की कौशल लवकरच विवाह बंधनात अडकणार? सलमानच्या स्टायलिस्टने दिले संकेत!
Vicky Kaushal-Katrina Kaif

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) या सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल कन्फर्म झाले नाही. दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात. विक्की कतरिनाच्या घराबाहेर बर्‍याचदा स्पॉट झाला होता. आता सलमान खानच्या स्टायलिस्टने कतरिनाच्या लग्नाबद्दल काही संकेत दिले आहेत.

शुक्रवारी कतरिनाने आपला 38वा वाढदिवस साजरा केला. कतरिनाच्या वाढदिवशी सलमान खानची स्टायलिस्ट अ‍ॅशले रेबेलो हिने तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच तिने चाहत्यांना संकेतही दिला आहे की कतरिना लवकरच लग्न करू शकते.

लग्नाच्या गाऊनमध्ये फोटो केला शेअर

अ‍ॅशलेने ‘भारत’ या चित्रपटाच्या सेटवरून कतरिना कैफचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना व्हाईट कलरच्या वेडिंग गाऊनमध्ये दिसली आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे कतरिना. लवकरच ते वास्तवात बदलेल.’

ही पोस्ट अ‍ॅशलेची असल्याने सोशल मीडियावर लोकांचा कयास बांधत आहेत की, कतरिना कैफ लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. चाहत्यांना असे वाटतेय की, सध्या दोघेही एकमेकांना डेट करत असल्याने कतरिना आणि विक्की कौशल लवकरच लग्न करणार आहेत.

हर्षवर्धन कपूरने केली पुष्टी

अलीकडेच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने विक्की कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली. हर्षवर्धनच्या पुष्टीनंतरही विक्की आणि कतरिना गप्प बसले आहेत. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला, तर कतरिनाच्या नात्याची पुष्टी केल्यामुळे ती हर्षवर्धनवर चिडली आहे. कतरिना आणि विक्की अद्याप आपलं नातं सर्वांसमोर जाहीर करत नाहीयत.

कतरिनाला विक्कीबरोबर काम करायचंय!

करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये जेव्हा कतरिना कैफला होस्ट करण कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करण्यास आवडेल असे विचारले होते, तेव्हा तिने सांगितले की विक्की कौशल आणि मी एकत्र चांगले दिसू. जेव्हा, विक्कीला हे कळले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता.

(Katrina Kaif And Vicky Kaushal marrying soon Salman khan stylist gives a hint)

हेही वाचा :

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या दिलखेचक अदा, सोशल मीडियावर फोटो शेअर

Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI