AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Business Plan : राज कुंद्रानं बनवले 119 अश्लिल चित्रपट, 2022 पर्यंत 98 लाख यूजर्स जोडण्याचं टार्गेट

उद्योगपती राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलिसांनी सध्या 1500 पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे.

Raj Kundra Business Plan : राज कुंद्रानं बनवले 119 अश्लिल चित्रपट, 2022 पर्यंत 98 लाख यूजर्स जोडण्याचं टार्गेट
राज कुंद्रा
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई: उद्योगपती राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलिसांनी सध्या 1500 पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. दैनिक भास्करनं दिलेल्या बातमीनुसार राज कुंद्रानं 2 वर्षात त्याच्या अ‌ॅपचे यूजर्स तीन पट वाढवण्याचं आणि फायदा 8 पट वाढवण्याचा प्लॅन तयार केला होता. तो त्याच्या 119 फिल्मचं कलेक्शन 8.84 कोटी रुपयांना विकणार होता. राज कुंद्राचं पहिलं अ‌ॅप हे अ‌ॅपल स्टोअर वरुन हटवण्यात आलं होत त्यानंतर त्यानं दुसरं अ‌ॅप बनवलं होतं. कुंद्रााला डिजीटल मीडियाच्या माध्यमातून अवैधरित्या पैसे कमवायचे होते. मात्र, ज्यावेळी मुंबई पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळताच त्याच्या प्लॅनचा भांडाफोड झाला आहे. यानंतर त्यानं सर्व माहिती डिलीट करुन स्वत: या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न केला होता.

राज कुंद्राला संपूर्ण डाटा डिलीट केल्यानंतर पोलीस त्याच्या पर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असं वाटलं होतं. पोलिसांनी राज कुंद्राला पहिल्यांदा नोटीस पाठवली होती, तेव्हा तो म्हणाला “मी आरोपी आहे का?, मी या पत्रावर सही करणार नाही” अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात राज कुंद्रानं त्यांना योग्य माहिती दिली नाही, उडवाउडवीची उत्तर देत होता, असा उल्लेख करण्यात आला आहे.

राज कुंद्राच्या कार्यालायतून 24 हार्ड डिस्क जप्त

राज कुंद्राच्या कार्यालयातून 24 हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये 35 चित्रपट पोलिसांना सापडले आहेत. दुसऱ्या संगणकामध्ये, पोलिसांना 16 चित्रपट मिळाले आहेत, जेथे दुसऱ्या संगणकावरून 60 पेक्षा जास्त चित्रपट आणि PPT सापडले आहेत, ज्यामुळे राज यांचा प्लॅन उघड होत आहे. राज कुंद्रा व्यतिरिक्त इतर आरोपींच्या संगणक आणि मोबाईलवरुन अॅपची सामग्री, खर्च, उत्पन्न आणि भविष्यातील योजनांसह इतर महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राज कुंद्राचे कर्मचारी पोलीस साक्षीदार बनले

राज कुंद्रा याच्या विहान एंटरप्रायजेसमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे. हे कर्मचारी या कार्यालयाच्या आयटी आणि लेखा विभागाचा भाग राहिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

अद्याप 2 आरोपी बाहेर

मुंबई पोलिसांनी या आरोपपत्रात प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीचे नावही घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की तो लंडनमध्ये राहतो, यामुळे त्याला पकडले गेले नाही. प्रौढ सामग्री न्यूफ्लिक्स अॅपवरही विकली गेली, यश ठाकूर, जे हे अॅप चालवतात, ते मूळचे कानपूर, यूपीचे रहिवासी आहेत, जिथे ते सध्या सिंगापूरमध्ये आहेत. ज्यामुळे पोलिसांनी त्याला अद्याप पकडले नाही.

राज कुंद्राची ग्राहक जोडण्याची ही योजना होती

राजचे आयटी मॅनेजर रायन थर्पचा लॅपटॉपही पोलिसांनी पकडला. या लॅपटॉपमध्ये, पोलिसांना राज कुंद्राला पुढील 2 वर्षांचा प्लॅन देखील सापडला आहे. राज यांचा PPT मध्ये अंदाज होता की त्यांना 2021 मध्ये 31 लाख ग्राहक आणि 2022 मध्ये 98 लाख ग्राहकांना जोडायचे आहे.

इतर बातम्या:

Sonu Sood : रिच ग्रुपशी सोनू सूदचे संबंध असल्याची माहिती, आजही 4 ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे सुरु

Bigg Boss Marathi 3 | ‘देवमाणूस’ फेम सोनाली पाटील, सुरेखा कुडची, अरुण गवळीचा जावई कन्फर्म?

Raj Kundra made 119 vulgarity movies had a plan to add 98 lakh subscribers by 2022

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.