Rakhi Sawant | आईच्या शस्त्रक्रियेसाठी सलमान खानची मदत, व्हिडीओ शेअर करत राखी सावंत म्हणाली…

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हीची आई बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. पण, आज (19 एप्रिल) सोमवारी ती यातून मुक्त होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:49 PM, 19 Apr 2021
Rakhi Sawant | आईच्या शस्त्रक्रियेसाठी सलमान खानची मदत, व्हिडीओ शेअर करत राखी सावंत म्हणाली...
राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हीची आई बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. पण, आज (19 एप्रिल) सोमवारी ती यातून मुक्त होणार आहे. आज राखी सावंतच्या आईचे महत्त्वाचे ऑपरेशन आहे, ज्याची माहिती स्वत: अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे. राखी सावंतने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, तिच्या आईचे हे ऑपरेशन बॉलिवूड अभिनेता सलमान खानमुळे (Salman Khan) शक्य झाले आहे (Rakhi Sawant share video and say thank you to Salman khan for helping mothers surgery).

यासाठी राखी सावंत आणि तिच्या आईने सलमान खानचे आभार देखील मानले आहेत. राखी सावंतने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, ‘आज आईचे ऑपरेशन आहे. डॉ. संजय शर्मा तिची कर्करोगाची शेवटची गाठ काढून टाकतील. याचा मला खूप आनंद झाला आहे. आता आई तुला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही. कर्करोग तुझ्या शरीरातून निघून जाईल.’

‘मी अशीच मरेन …’

यावर राखीची आई हात जोडून म्हणाली की, ‘मी सलमानजींना सलाम करते. आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो की, आता आमच्याकडे पैसे नाहीत, तर आम्ही पुढे काय करावे? मी आता आशीच मारून जाईन… पण देवाने सलमान खानला दूत म्हणून आमच्या आयुष्यात पाठवले. तो माझ्यासाठी उभा राहिला आणि आज माझे ऑपरेशन होत आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब माझ्यासाठी उभे आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्याचे कुटुंब नेहमी आनंदी राहो आणि सर्व संकटांतून तो सुरक्षित राहा. देवा तुझे आशीर्वाद सलमानच्या पाठीशी असू दे.’(Rakhi Sawant share video and say thank you to Salman khan for helping mothers surgery)

यानंतर राखी म्हणाली की,“धन्यवाद, सलमान जी, आज तुम्ही माझ्या आईचे आयुष्य वाचवले. आज, एवढे मोठे ऑपरेशन देव आणि तुमच्यामुळेच केले जात आहे. प्रत्येक घरात सलमान आणि सोहेल सारखा मुलगा असावा.’ या व्हिडिओमध्ये राखीने असेही सांगितले की, सलमान खानच्या मदतीने तिने डॉ. संजय शर्मा यांच्याशी संपर्क साधला, यासाठी ती भाईजानची खूप आभारी आहेत.

पाहा राखी सावंतचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

यापूर्वीही राखी सावंतच्या मदतीसाठी सलमानचे कुटुंब पुढे आले होते. याचा खुलासा स्वतः राखी यांनी केला होता. राखीने सांगितले होते की, जेव्हा ती अतिशय हालाखीच्या परिस्थितीत होती, तेव्हा सोहेल खानने तिला मदत केली. तिने म्हटले होते की, जर सोहेल त्यावेळी नसता तर, ती आज रस्त्यावर आली असती. परंतु, सोहेलने त्यांना मदत केली आणि तिचे कुटुंब वाचवले.

(Rakhi Sawant share video and say thank you to Salman khan for helping mothers surgery)

हेही वाचा :

Indian Idol 12 | पवनदीप-आशिषला कोरोना, आता सवाई भटची प्रकृती ढासळली, मध्यातच सोडला शो!

Prabhas | मृत्युच्या दारी असलेल्या चाहत्याची शेवटची इच्छा, शुटींग सोडून प्रभास पोहोचला भेटीला!