रणबीरची नजर कतरिनावरून हटेना; व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Oct 06, 2022 | 6:11 PM

जेव्हा एक्स-गर्लफ्रेंड अचानक समोर येते..

रणबीरची नजर कतरिनावरून हटेना; व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
Katrina Kaif
Image Credit source: Instagram

मुंबई- बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी एकेकाळी एकमेकांना डेट केलंय. मात्र आता त्या कलाकारांचे मार्ग वेगळे झाले आहेत. असं असलं तरी बॉलिवूडचे एक्स-कपल जेव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये एकमेकांसमोर येतात, तेव्हा ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. असंच काहीसं सध्या कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) घडलंय. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ब्रेकअपनंतर त्यांनी सहसा एकमेकांसमोर येणं टाळलंच. आता रणबीरने आलिया भट्टशी (Alia Bhatt) लग्न केलंय, तर कतरिना विकी कौशलसोबत लग्नबद्ध झाली आहे. आता नुकत्याच एका कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. यावेळी कतरिनाने रणबीरकडे पाहणंसुद्धा टाळल्याचं कळतंय.

सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ नवरात्री सेलिब्रेशनचा आहे. केरळमधील कल्याणरमन रेसिडेन्स याठिकाणी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या सेलिब्रिटींसाठी खास नवरात्रीची मोठी पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूडमधून कतरिना कैफ, रणबीर कपूर या पूजेला हजर होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आर. माधवन, नागार्जुन, कल्याणी प्रियदर्शन, प्रिया वॉरियर यांसह अनेक सेलिब्रिटी या पुजेला उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हे सेलिब्रिटी दुर्गा देवीची आरती आणि पूजा करताना दिसत आहेत.

जेव्हा कतरिना आरती घेण्यासाठी पुढे जाते, तेव्हा बाजूला उभा असलेला रणबीर तिच्याकडेच पाहताना दिसतोय. नेमका हाच क्षण कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तर एका व्हिडीओमध्ये कतरिना मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स येत आहेत. ‘रणबीरची नजर कॅटवरून हटतच नाहीये’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘रणबीर भाईकडे पहा, कतरिनाकडे कसा बघतोय’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI