Arshdeep Singh: अर्शदीपला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचं कडक शब्दांत उत्तर

याआधी अभिनेता आयुषमान खुरानाने चाहत्यांना विनंती केली होती. अर्शदीपवर टीका करू नका, त्याला ट्रोल करू नका असं तो म्हणाला. याशिवाय स्वरा भास्कर, गुल पनाग आणि पूजा भट्ट या सेलिब्रिटींनीसुद्धा अर्शदीपची बाजू घेतली होती.

Arshdeep Singh: अर्शदीपला ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचं कडक शब्दांत उत्तर
Arshdeep Singh: अर्शदीपच्या ट्रोलर्सवर रिचा चड्ढाची 'या' शब्दांत टीका
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 07, 2022 | 4:08 PM

रविवारी पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) झेल सोडला. 18 व्या ओव्हरमध्ये अर्शदीपच्या हातून आसिफ अलीचा कॅच सुटला. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. सोशल मीडियावर अर्शदीपला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. इतकंच नव्हे तर ट्रोलर्सनी त्याला खलिस्तानी (Khalistani) म्हणूनही हिणवलं. अर्शदीपचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीमच्या बसमध्ये चढताना त्याला ‘गद्दार’ असं म्हटलं गेलं. या व्हिडीओवर अभिनेत्री रिचा चड्ढाने (Richa Chadha) प्रतिक्रिया देत ट्रोलरला कडक शब्दांत सुनावलं आहे.

‘घाणेरडा, ढेरपोट्या आणि जिंकण्याची क्षमता नसलेल्या या व्यक्तीला गोगलगायसुद्धा हरवू शकेल. असा माणूस एका खेळाडूला बदनाम करण्याचं धाडस दाखवतोय. खुर्चीत बसून टीका करणं खूप सोपं असतं. स्वत:च्या आयुष्यातील राग दुसऱ्यावर काढणं थांबवा. अर्शदीप पाजी, तुस्सी कोई लोड ना लो (ताण घेऊ नका). लव्ह यू’, असं ट्विट रिचाने केलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये अर्शदीप टीमच्या बसच्या दिशेने जाताना दिसत आहे. तो बसमध्ये चढण्याआधी कॅमेरामागे असलेला एक व्यक्ती त्याच्यावर टीका करत असल्याचं ऐकू येतंय. ते त्याला ‘गद्दार’ असंही म्हणतात.

पहा व्हिडीओ-

याआधी अभिनेता आयुषमान खुरानाने चाहत्यांना विनंती केली होती. अर्शदीपवर टीका करू नका, त्याला ट्रोल करू नका असं तो म्हणाला. याशिवाय स्वरा भास्कर, गुल पनाग आणि पूजा भट्ट या सेलिब्रिटींनीसुद्धा अर्शदीपची बाजू घेतली होती.

“टीम इंडियाने जिंकावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण जेव्हा असं घडत नाही, तेव्हा चाहते खेळाडूंवर राग काढतात. सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोष्टींचा अर्शदीपवर काहीही परिणाम झालेला नाही. त्याचं सगळ लक्ष श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यावर आहे,” अशी प्रतिक्रिया अर्शदीपच्या वडिलांनी दिली होती.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें