AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सबा आझाद हिने EX बॉयफ्रेंडची घेतली गळाभेट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अनेकांना हृतिक आणि सबाची जोडी अजिबातच आवडत नाही, यांच्या फोटोंवर बाप आणि लेकीची सुंदर जोडी म्हणत अनेकजण कमेंट करतात.

सबा आझाद हिने EX बॉयफ्रेंडची घेतली गळाभेट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
| Updated on: Dec 02, 2022 | 5:57 PM
Share

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. हृतिक हा सबा आझाद हिला डेट करतोय. इतकेच नाही तर अनेकदा हे दोघे कार्यक्रमांना देखील सोबत हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सबा लंडनला फिरायला गेले होते, त्यावेळी हृतिकने सबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, अनेकांना हृतिक आणि सबाची जोडी अजिबातच आवडत नाही, यांच्या फोटोंवर बाप आणि लेकीची सुंदर जोडी म्हणत अनेकजण कमेंट करतात.

हृतिक रोशन आणि सबा हिच्या वयामध्ये जास्त अंतर आहे. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, हृतिक आणि सबा आता सोबतच राहणार असून यांनी एक नवीन घर देखील मुंबईमध्ये खरेदी केले आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे हृतिक रोशन यांने सांगितले होते.

आता पुन्हा एका हृतिक रोशन आणि सबा आझाद प्रचंड चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर हृतिक, सबा आणि सबाच्या EX बॉयफ्रेंडचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मुंबईतील एका हाॅटेलबाहेरचा असल्याचे सांगितले जातंय.

View this post on Instagram

A post shared by Nyam Nyam Azrha (@nyamazrha)

सबा आझाद ही हृतिक रोशनच्या अगोदर इमाद शाह याला डेट करत होती. मात्र, काही गोष्टींमुळे या दोघांमध्ये ब्रेकअप झाले आणि ती आता हृतिक रोशनला डेट करत आहे. हृतिक, सबा आणि इमाद शाह एका हाॅटेलमध्ये भेटले होते आणि तिथेच त्यांनी जेवणही केले.

हाॅटेलच्या बाहेर पडताना हृतिक रोशन याने इमाद शाह याची गळा भेट घेतली. इतकेच नाही तर सबाने देखील इमाद शाहची गळा भेट घेतली. त्यानंतर इमाद शाह निघून गेला. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

नसीरुद्दीन शाह यांचा इमाद शाह हा मुलगा असून याला काही वर्ष सबा डेट करत होती. मात्र, या दोघांमध्ये ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअप होऊनही सबा आणि इमाद शाह चांगले मित्र आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकजण ट्रोल करत आहेत.

सबा आझाद हिने इमाद शाह याची गळा भेट घेतल्याचे नेटकऱ्यांना अजिबातच आवडलेले दिसत नाही. सबा आझादला यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. हृतिक रोशन समोर हिने इमाद शाहची गळा भेट कशी घेतली, यावर नेटकरी तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.

मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.