AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, बंगालमधून थेट महिलेला अटक; आरोपीशी कनेक्शन काय?

सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी शहजादला अटक झाल्यानंतर आता पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला शहजादला सिमकार्ड पुरवत होती. पोलिसांना शहजादच्या सिमकार्डाची माहिती या महिलेकडून मिळाली.

सैफ अली खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, बंगालमधून थेट महिलेला अटक; आरोपीशी कनेक्शन काय?
Saif Ali KhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 27, 2025 | 11:03 PM
Share

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात रोज नवा ट्विस्ट येत आहे. आजही या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी नागरिक असलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी शहजाद याच्या ओळखीची ही महिला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या महिलेच्या चौकशीतून कोणती गोष्ट बाहेर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सैफवर फक्त शहजादने हल्ला केलेला असताना ही महिला आली कुठून? याबाबतचेही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

न्यूज एजन्सी पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी सोमावारी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात छापेमारी केली होती. त्यावेळी या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजादने जे सिमकार्ड वापरले होते. ते कार्ड या महिलेच्या नावावर होतं. त्यामुळे या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून सखोल माहिती मिळवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईत आणणार

दरम्या, रविवारी दोन पोलिसांची टीम पश्चिम बंगालमध्ये गेली होती. त्यानंतर नदिया जिल्ह्यातील छपरा येथून या महिलेची अटक करण्यात आली. या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेख असं आहे. ही महिला शहजादच्या ओळखीची आहे. आता या महिलेला बंगालहून मुंबईला आणण्यासाठी पोलीस ट्रान्झिस्ट रिमांडची मागणी करू शकतात. पीटीआयच्या वृत्तानुसार, शहजाद सिलिगुडी जवळील भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसला होता. त्यानंतर तो या महिलेच्या संपर्कात आला. ही महिला पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अंदुलिया येथील राहणारी आहे.

महिलेबाबतची अपडेट काय?

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला सिमकार्ड मिळवून देणारी महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवला आहे. मात्र, आतापर्यंतच्या चौकशीत या महिलेवर कोणताही संशय ठेवण्यासारखं आढळलेलं नाही. फक्त तिने आरोपीला बेकायदेशीरपणे सिमकार्ड मिळवून दिल्याचं उघड झालं आहे. मात्र, असं असलं तरी पोलिसांनी या महिलेची अटक केली आहे. तिची अधिक चौकशी केल्यानंतर त्यातून माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन