Salman Khan | धमकीचा ईमेल आल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये वाढ, वाचा नेमके काय बदल
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान याला एक धमकीचा ईमेल आलाय. सलमान खान याला धमकीचा ईमेल आल्यापासून चाहते चिंतेमध्ये आहेत.

मुंबई : सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान (Salman Khan) याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. मुंबई (Mumbai) पोलिसांनी सलमान खान याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सलमान खान याच्या खासगी सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अंगरक्षक शेरा याच्याकडे आहे. सलमान खान याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्याकडून सतत धमक्या दिल्या जात आहेत. नुकताच सलमान खान याला ईमेल पाठवून धमकी देण्यात आलीये, त्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीये.
लॉरेन्स बिश्नोई याने यापूर्वी बऱ्याच वेळा सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. जून 2022 मध्येही एका अज्ञात व्यक्तीने सलमान खान याला धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई कायमच सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देतो. आता थेट सलमान खान याला ईमेल पाठवण्यात आलाय.
सलमान खान याला सरकारकडून वाय प्लस सुरक्षा मिळते. इतकेच नाहीतर गेल्या वर्षी सलमान खान याने मोठा निर्णय घेत स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवानाही घेतला आहे. सलमान खान याने काळवीटची शिकार केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई याच्या मनात राग आहे. अनेकदा यावर लॉरेन्स बिश्नोई हा बोलला देखील आहे.
धमकीच्या ईमेलनंतर सलमान खान याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये सलमान खान हा राहतो. सलमान खान याच्या घराबाहेर एक पोलिसांची गाडी कायम तैनात असते. आता या धमकीनंतर सलमान खान याच्या घराबाहेर पोलिसांच्या दोन गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच खासगी सुरक्षा दलही तेथे हजर आहे.
मुंबईत राहणाऱ्या कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार ठरवते. केंद्राच्या बाबतीत गृह मंत्रालय निर्णय घेते. Y+ सुरक्षेमध्ये पुरविलेल्या पोलिस सुरक्षेत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सलमान खान याच्या गाडी मागे कायमच मुंबई पोलिसांची एक गाडी असते. आता मुंबई पोलिसांकडून सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आलीये.
सलमान खान याला धमकीचा ईमेल आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याचा हात आहे. यामुळे सलमान खान याचे चाहते चिंतेत आहेत.
