AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 BHK घरात अत्यंत साधेपणानं राहतो सलमान खान; कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने केला खुलासा

सलमान खान नुकताच शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 BHK घरात अत्यंत साधेपणानं राहतो सलमान खान; कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने केला खुलासा
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2023 | 9:50 AM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मात्र सुपरस्टार असूनही सलमानला साधं राहणीमान आवडतं. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानच्या लाइफस्टाइलविषयी खुलासा केला. यावेळी त्याने सुपरस्टारच्या साध्या राहणीमानाचं कौतुकसुद्धा केलं. रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये मुकेशने हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये मुकेशने सलमानचं तोंडभरून कौतुक केलं. सलमान ही अशी एकमेव व्यक्ती आहे जी प्रत्येकाच्या मदतीला धावून येते, असं तो म्हणाला. “तो प्रामाणिक आहे आणि लोक त्याच्या याच प्रामाणिकपणाचा गैरसमज करून घेतात. हीच समस्या आहे की जेव्हा तुम्ही काही प्रामाणिकपणे म्हणता, तेव्हा लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात”, असंही मुकेश म्हणाला.

“तुम्ही जर त्याला मध्यरात्री 3 वाजता कॉल केला, तरी तो तुमचा फोन उचलेल. प्रत्येकालाच एवढंच प्रेम मिळत नाही. देवाने अशा प्रेमासाठी खास व्यक्ती निवडलेली असते आणि सलमान त्यापैकीच एक आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत.. प्रत्येकजण त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो”, अशा शब्दांत मुकेशने सलमानचं कौतुक केलं. मुकेशने सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाइट’ या चित्रपटांसाठी कास्टिंग निवडली होती.

सलमानच्या लाइफस्टाइलविषयी तो पुढे म्हणाला, “फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की तो ज्या घरात राहतो, ते फक्त 1BHK अपार्टमेंट आहे. त्याच्या घरात एक सोफा, एक डायनिंग टेबल आणि एक छोटीशी जागा आहे, जिथे तो लोकांशी बोलतो. त्यातच एक छोटी जिम आणि एक छोटी खोली आहे. अशी सलमानची, या देशातल्या सुपरस्टारची लाइफस्टाइल आहे. तो अत्यंत साधं जीवन जगतो. त्याला फॅन्सी ब्रँड्स किंवा महागड्या वस्तू विकत घेणं आवडत नाही. खाण्यातही त्याचे नखरे नसतात. त्याला जे देणार, ते तो खातो आणि सर्वसामान्यांप्रमाणेच राहतो. मी त्याच्यासोबत गेल्या 15 वर्षांपासून काम करतोय आणि तो जराही बदलला नाही.”

सलमान खान नुकताच शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहाद सामजीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय तो कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत ‘टायगर 3’ या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.