Sapna Choudhary : गंभीर अपघातात ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीचा मृत्यू?, जाणून घ्या व्हायरल वृत्तामागचं सत्य

प्रसिद्ध ‘हरियाणवी क्वीन’ अर्थात नृत्यांगना-अभिनेत्री सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) मृत्यूची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे, तिच्या चाहत्यांना यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. कालपासून प्रत्येकजण सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहे.

Sapna Choudhary : गंभीर अपघातात ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरीचा मृत्यू?, जाणून घ्या व्हायरल वृत्तामागचं सत्य
सपना चौधरी

मुंबई : प्रसिद्ध ‘हरियाणवी क्वीन’ अर्थात नृत्यांगना-अभिनेत्री सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) मृत्यूची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे, तिच्या चाहत्यांना यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. कालपासून प्रत्येकजण सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहे. व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, डान्सर सपना चौधरीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तथापि, Tv9सह झालेल्या संभाषणात सपनाच्या व्यवस्थापकाने आम्हाला सांगितले की, सपना पूर्णपणे बरी आहे, तिला काहीही झालेले नाही.

वास्तविक, सिद्धार्थ शुक्ला, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर चाहते लगेच कोणतीही बातमी सत्य मानतात आणि म्हणूनच हा संदेश व्हायरल झाल्यापासून सपना चौधरीचे चाहते चिंतेत होते. हा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला जात असताना, तिचे चाहते या बातमीमागील सत्य जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत होते. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी नाही. एका रस्ता अपघातात एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे.

सपना नावाच्या आणखी एका कलाकाराचे झाले निधन

वास्तविक सपना नावाच्या आणखी एका अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. पण ज्यांनी ही बातमी व्हायरल केली, त्यांनी त्या सपनाला सपना चौधरी असे लिहून सोशल मीडियावर ती चालवले. हरियाणामध्येच नाही, तर संपूर्ण भारतात सपना चौधरीचे चाहते आहेत. बिग बॉसमध्येही तिने आपले नशीब आजमावले. आज सपना सोशल मीडियावर 3.4 दशलक्ष चाहत्यांची लाडकी आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांचे मनोरंजन करते. देश-विदेशातील लोक तिचे व्हिडीओ पाहतात. तिच्या व्हिडीओंच्या खाली लिहिलेल्या टिप्पण्या या गोष्टीचा पुरावा आहेत.

लोकांना आवडते देसी शैली

सपना चौधरी तिच्या देसी शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले सपनाचे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या ‘घूम घाघरा’ ला आतापर्यंत 10 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. केवळ हे गाणेच नाही, तर BTS अर्थात या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ देखील लोकांना आवडला आहे. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी जमिनीवर बसून तिचा पल्लू हवेसोबत उडवत आहे. तिची हीच देसी शैली प्रेक्षकांना खूप आवडते.

‘घागरा’वर सपनाचे ठुमके

काही दिवसांपूर्वी सपनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सपना तिच्या घरात टीव्हीसमोर हरियाणवी गाणे ‘घागरा’वर पिवळ्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसली होती. या डान्स व्हिडीओला सपनाचे चाहते प्रचंड पसंती देत ​​आहेत आणि कमेंट करत आहेत. सपनाची लोकप्रियता अशी आहे की, तिच्या कोणत्याही गाण्यावर लगेचच कोट्यावधी व्यूव्ह मिळतात.

हरियाणवी क्वीन सपना चौधरी नेहमीच तिच्या देसी स्टाईलबाबत चर्चेत असते. हरियाणवी गाण्यांवर नाचणारी सपना चौधरी तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. त्याचबरोबर तिची देसी स्टाईल आणि संसारावरील प्रेम तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. लॉकडाऊन दरम्यान फारशी साफ करतानाचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. सपना चौधरीचे व्हिडीओ खूप पाहिले जात आहेत.

हेही वाचा :

ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे यांच्या चार सर्वोत्तम कादंबऱ्यांची ऑडिओबुक्स मालिका चांगदेव चतुष्ट्य!

Happy Birthday Akshay Kumar | दिल्लीच्या चांदनी चौकपासून सुरु झालेला प्रवास मुंबईत येऊन यशाच्या शिखरावर पोहोचला, वाचा बॉलिवूडच्या ‘खिलाडी’बद्दल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI