AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, ‘त्या’ फार्म हाऊसमधून ‘औषधे’ जप्त; कोणती आहेत औषधे?

मृत्यूच्या दोन दिवस आधी सतिश कौशिक मनसोक्तपणे होळी खेळले. त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची धुळवड असले असं त्यांना वाटलंही नसेल. त्यांनी 7 मार्च रोजी जावेद अख्तर यांच्या मुंबईतील घरी होळीची पार्टी एन्जॉय केली होती.

सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, 'त्या' फार्म हाऊसमधून 'औषधे' जप्त; कोणती आहेत औषधे?
Satish KaushikImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 11, 2023 | 9:39 AM
Share

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही कार्डियाक अरेस्टमुळे कौशिक यांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे. सतिश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की आणखी काही कारणामुळे याचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिकही सहभागी झाले होते. पोलिसांनी या फार्म हाऊसचा कसून तपास केला आहे. या तपासात पोलिसांना काही औषधे सापडली आहे. यात डायजीन आणि शुगरची नियमित औषधेही आहेत. त्याशिवाय इतरही काही औषधे सापडली आहेत. ही औषधे कोणती आहेत? ती आजारांवरचीच आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात काहीच संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अधिक चौकशीसाठी रक्त आणि हृदय बाजूला ठेवण्यात आलं आहे. आठ पंधरा दिवसात रक्त आणि हृदयाच्या रिपोर्टचा अहवाल मिळणार आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलीस डिटेल पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतरच कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे. त्याशिवाय पोलिसांनी होळीच्या पार्टीतील गेस्टची यादीही मागवली आहे.

मनसोक्त होळी खेळले

मृत्यूच्या दोन दिवस आधी सतिश कौशिक मनसोक्तपणे होळी खेळले. त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची धुळवड असले असं त्यांना वाटलंही नसेल. त्यांनी 7 मार्च रोजी जावेद अख्तर यांच्या मुंबईतील घरी होळीची पार्टी एन्जॉय केली होती. यावेळी सर्वच कलाकारांशी त्यांनी होळी खेळत मनसोक्त गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर ते 8 मार्च रोजी होळी खेळण्यासाठी दिल्लीत आले होते.

दिल्लीतील बिजवासन येथील फॉर्महाऊसवर ते कुटुंबासह होळी खेळायला आले होते. 8 मार्च रोजीही त्यांनी होळीचा प्रचंड आनंद लुटला. त्यानंतर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावलं आणि त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांना तात्काळ फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...