Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे चाहते ज्या गाण्याची वाट पाहत होते, ते गाणे अखेर आज (10 नोव्हेंबर) म्हणजेच बुधवारी रिलीज झाले आहे. आपण बोलत आहोत 'सत्यमेव जयते 2' चित्रपटातील 'कुसु कुसू' या गाण्याबद्दल. हे या चित्रपटातील एक आयटम साँग आहे, ज्यामध्ये नोरा फतेही अतिशय जबरदस्त अंदाजात थिरकताना दिसली आहे.

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!
Nora Fatehi

मुंबई : अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे चाहते ज्या गाण्याची वाट पाहत होते, ते गाणे अखेर आज (10 नोव्हेंबर) म्हणजेच बुधवारी रिलीज झाले आहे. आपण बोलत आहोत ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटातील ‘कुसु कुसू’ या गाण्याबद्दल. हे या चित्रपटातील एक आयटम साँग आहे, ज्यामध्ये नोरा फतेही अतिशय जबरदस्त अंदाजात थिरकताना दिसली आहे. नोराच्या डान्स मूव्हज रसिकांना घायाळ करणाऱ्या आहेत, जे पाहून तिच्या चाहत्यांच्या नक्कीच आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरीसाठी नोरा फतेही ‘लकी चार्म’ आहे. कारण ‘दिलबर’ आणि ‘एक तो कम जिंदगानी’ सारख्या प्रतिष्ठित गाण्यांमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर दिग्दर्शकासह नोराचा हा तिसरा धमाकेदार डान्स नंबर आहे. या गाण्याला झारा खान आणि देव नेगी यांनी आवाज दिला आहे. त्याच वेळी, ‘कुसू कुसू’ हे तनिष्क बागची यांनी लिहिलेले मूळ गाणे आहे.

नोरा फतेहीची किलर स्टाईल

गाण्याच्या व्हिडीओबद्दल बोलायचे झाले, तर यात नोरा फतेहीच्या डान्स मूव्हज खूप छान आहेत. दिव्यांनी उजळलेला सेट प्रेक्षकांना आणखी आकर्षित करेल. गाण्याचं संगीत ऐकूनही छान वाटतं. इतकंच नाही तर या गाण्यात जॉन अब्राहमची झलकही पाहायला मिळाली. तिच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी, नोरा आदिल शेख यांनी कोरिओग्राफ केलेल्या गाण्यात काही स्फोटकपणे जबरदस्त आकर्षक बेली डान्स करताना दिसली आहे.

नोरा फतेहीचे ‘कुसू कुसू गाणे’ पहा

या गाण्याबद्दल उत्साहित असलेली नोरा फतेही म्हणते, “सत्यमेव जयतेचे माझ्या आयुष्यात एक विशेष स्थान आहे आणि मी सत्यमेव जयते 2चा भाग बनून खूप आनंदी आहे. ‘दिलबर’च्या यशानंतर दिलरुबासोबत परत येणं खूप छान वाटतं. मला पुन्हा एकदा संधी देऊन काहीतरी वेगळं करायला निवडल्याबद्दल मी मिलाप, निखिल सर आणि भूषण सरांची आभारी आहे. मी कुसु कुसूमध्ये झळकण्यासाठी उत्सुक आहे आणि मी सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.”

दरम्यान, मिलाप मिलन झवेरी म्हणतो, “दिलबर आणि एक तो कम जिंदगानीनंतर नोरा कुसू कुसूचा एक भाग आहे याचा मला आनंद झाला आहे. ती माझ्यासाठी एक लकी चार्म आहे आणि तिच्या प्रचंड प्रतिभेने संपूर्ण देशाला, खरंच जगाला आणि तिच्या सौंदर्य आणि नृत्याचे कट्टर प्रशंसक असलेल्या सर्वांना मोहित केले आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवल्याबद्दल आणि सत्यमेव जयते 2 चा भाग असल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.”

जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार अभिनीत ‘सत्यमेव जयते 2’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार (टी-सिरीज), मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी (एमे एंटरटेनमेंट) यांनी केली आहे. हा चित्रपट गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

केवळ मनोरंजनच नाही तर, मालिकेतून सामाजिक संदेश, ‘मन उडु उडु झालं’च्या कलाकारांचा स्त्युत्य उपक्रम!

हाऊ रोमँटिक! भावी पत्नी पत्रलेखाला लग्नाच्या दिवशी ‘हे’ खास गिफ्ट देऊ इच्छितो राजकुमार राव!


Published On - 12:27 pm, Wed, 10 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI