AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey Singh | हनी सिंह आणि त्याच्या टिमवर गंभीर आरोप, पोलिसांनी तपास केला सुरू, वाचा संपूर्ण प्रकरण

हनी सिंह याने अनेक वर्षांनंतर दणदणीत असे पुनरागमन नक्कीच केले आहे. हनी सिंह याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट सातत्याने बघत होते. हनी सिंह हा सध्या प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. मात्र, सध्या थोड्या वेगळ्या कारणामुळे हनी सिंह हा चर्चेत आलाय.

Honey Singh | हनी सिंह आणि त्याच्या टिमवर गंभीर आरोप, पोलिसांनी तपास केला सुरू, वाचा संपूर्ण प्रकरण
| Updated on: Apr 20, 2023 | 6:05 PM
Share

मुंबई : रॅपर आणि गायक हनी सिंह हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हनी सिंह (Honey Singh) याच्या पुनरागमनामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. न्यू म्यूजिक अल्बम हनी 3.0 चे जोरदार प्रमोशन करताना हनी सिंह हा दिसतोय. विशेष म्हणजे या प्रमोशन दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे (Shocking revelations) करताना हनी सिंह हा दिसला. हनी सिंह याने सात वर्ष आपल्यासोबत काय घडते होते आणि आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीमधून जात होतो, हे सांगताना हनी सिंह हा दिसला. या काळात हनी सिंह याने सांगितले की, आपल्याला टीव्ही (TV) बघण्याची देखील भिती वाटत होती.

नुकताच हनी सिंह आणि त्याच्या टिमवर अत्यंत गंभीर आरोप हा करण्यात आलाय. विवेक रवि रमन यांनी हनी सिंह आणि त्याच्या टिमविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. विवेक रवि रमन यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आता या सर्व प्रकरणात पोलिसांनी तपास हा सुरू केलाय. मात्र, या तक्रारीनंतर हनी सिंह याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

विवेक रवि रमन यांनी हनी सिंह आणि त्याच्या टिम विरोधात तक्रार दाखल केलीये. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अजून FIR नोंदवली नाहीये. विवेक रवी रमण हे फेस्टिविना म्युझिक फेस्टिव्हल कंपनी इव्हेंट एजन्सीचे मालक आहेत. रमन यांनी हनी सिंग 3.0 नावाचा संगीत महोत्सव आयोजित केला होता. हा कार्यक्रम मुंबईतील बीकेसी मैदानावर 15 एप्रिल रोजी होणार होता.

काही कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय हा आयोजकांनी घेतला. मात्र, यानंतर हनी सिंह आणि त्याची टिम नाराज झाली. यानंतर थेट हनी सिंह आणि त्याच्या टिमने विवेक रवि रमन यांच्यावर हल्ला केला. विवेक रवि रमन यांनी मारहाण, अपहरण असे गंभीर आरोप हनी सिंह आणि त्याच्या टिमवर केले आहेत.

विवेक रवि रमन यांनी सांगितले की, पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये माझे अपहरण करण्यात आले. बीकेसीमधून जेडब्ल्यू, मॅरियट, सहारा मुंबई येथे मला नेण्यात आले तिथे मला मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर मला बळजबरीने बिल भरायला देखील लावले. आता या आरोपांनंतर हनी सिंह याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आता या प्रकरणात पुढे नेमके काय होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?