AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dunki Movie | ‘डंकी’ चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आला समोर, पाहा व्हायरल VIDEO

शाहरुख खान आपल्या लूक लपवत आणि चाहत्यांपासून लपून जाताना हे काही पहिल्यांदाचे अजिबात नसून या अगोदरही अनेकदा शाहरुख चाहत्यांपासून लपून जाताना दिसला आहे. याआधीही शाहरुख खान अनेक प्रसंगी चाहत्यांपासून आपला लूक लपवताना दिसला आहे.

Dunki Movie | 'डंकी' चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आला समोर, पाहा व्हायरल VIDEO
| Updated on: Jul 23, 2022 | 9:58 AM
Share

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या लंडनमध्ये डंकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डंकी चित्रपटाला दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने त्याच्या डंकी चित्रपटाविषयी (Dunki Movie) माहिती दिली होती. याशिवाय शाहरुख खानचे अनेक बॅक टू बॅक सिनेमे येणार आहेत. यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी यंदाचे वर्ष एखाद्या परवणीपेक्षा कमी नक्कीच नसणार आहे. लंडनला शूटिंगसाठी पोहोचलेल्या शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तो कारमध्ये बसलेला दिसत आहे.

इथे पाहा शाहरुख खानचा व्हायरल होणारा व्हिडीओ

शाहरुखच्या डंकी चित्रपटाचे शूटिंगसाठी लंडन सुरू

शाहरुख डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. शूटिंगदरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी पापाराझी मंगलानीनेही आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान चाहत्यांपासून लपून कारमध्ये बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गर्दीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकदम फास्ट गाडीमध्ये बसतो आहे.

लाल रंगाच्या जॅकेटमध्ये शाहरुखचा जबरदस्त लूक

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शाहरुख खानने लाल रंगाचे जॅकेट घातले आहे आणि त्यामध्ये त्याचा लूक अत्यंत जबरदस्त दिसतोयं. मात्र हा लूक त्याच्या कोणत्या चित्रपटाचा आहे की नाही हे अघ्याप कळू शकले नाहीयं. हा व्हिडिओ शेअर करताना, मंगलानीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटाच्या शूटमधील शाहरुख खानचा हा लूक आहे.

काही दिवसांपूर्वीच जवान चित्रपटातील शाहरुखचा लूक शेअर

शाहरुख खान आपल्या लूक लपवत आणि चाहत्यांपासून लपून जाताना हे काही पहिल्यांदाचे अजिबात नसून या अगोदरही अनेकदा शाहरुख चाहत्यांपासून लपून जाताना दिसला आहे. याआधीही शाहरुख खान अनेक प्रसंगी चाहत्यांपासून आपला लूक लपवताना दिसला आहे. नेता शाहरुख खानने काही दिवसांपूर्वीच जवान चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. त्याचा तो लूक पाहून चाहते अधिकच उत्साही झाल्याचे दिसते आहे. आता शाहरूकचे चाहते डंकी चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार