Aryan Khan: ‘माझा पासपोर्ट परत द्या’; आर्यन खानची कोर्टात याचिका दाखल

| Updated on: Jul 01, 2022 | 9:35 AM

NCB ने आर्यन खान आणि इतर पाच जणांना पुरेशा पुराव्याअभावी क्लिन चिट दिली. आर्यन खानने जामिनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. गुरुवारी त्याने त्याच्या वकिलांच्या मार्फत विशेष कोर्टात याचिका दाखल केली.

Aryan Khan: माझा पासपोर्ट परत द्या; आर्यन खानची कोर्टात याचिका दाखल
आर्यन खान
Image Credit source: Twitter
Follow us on

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टासमोर याचिका दाखल करत त्याचा पासपोर्ट (passport) परत करण्याची मागणी केली. आर्यनला गेल्या वर्षी क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. जवळपास महिन्याभरापूर्वी त्याला या प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. पासपोर्टसाठी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी 13 जुलैला सुनावणी होणार आहे. आर्यनला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये NCB ने हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. परंतु तपास संस्थेनं मे महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात पुराव्याअभावी आर्यनला क्लिन चिट दिली.

जामिनाच्या अटींवर पासपोर्ट जमा

NCB ने आर्यन खान आणि इतर पाच जणांना पुरेशा पुराव्याअभावी क्लिन चिट दिली. आर्यन खानने जामिनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. गुरुवारी त्याने त्याच्या वकिलांच्या मार्फत विशेष कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये त्याचं नाव नसलेल्या आरोपपत्राचा हवाला देत पासपोर्ट परत करण्याची मागणी केली.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी 27 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता शाहरुख खानचा आर्यन खान आणि इतर पाच जणांना दोषमुक्त केलं. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. याप्रकरणी आता 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं. एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यनसह इतर सहा जणांना अटक केली होती. आर्यनने जवळपास एक महिना तुरुंगात घालवला होता. एनसीबीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. आर्यनला या प्रकरणात गोवण्यात आलं असावं आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा आरोपही झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा