AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case Clean Chit:आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट; आता जाणार शिक्षणासाठी बाहेर; फिल्म मेकिंग कोर्ससाठी अमेरिकेचा विचार?

ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान चित्रपट निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे.

Drugs Case Clean Chit:आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट; आता जाणार शिक्षणासाठी बाहेर; फिल्म मेकिंग कोर्ससाठी अमेरिकेचा विचार?
आर्यन खानImage Credit source: tv9
| Updated on: May 27, 2022 | 10:23 PM
Share

मुंबई : एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर (Cordila Cruz) छापा टाकला होता. त्यात एनसीबीने आर्यन खानसोबत इतर सात जणांना ताब्यात घेतले होते. एनसीबीने (NCB) आर्यन खानची कसून चौकशी केली होती. आणि त्या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक केली होती. तर त्याला 26 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर शाहरूख खानच्या चाहत्यांसह आर्यनवर प्रेम करणाऱ्या अनेकांना आता तो काय करणार असाच प्रश्न पडला आहे. तर आता शाहरूख खानच्या चाहत्यांसह आर्यनवर (Aryan Khan) प्रेम करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज त्याच्या धाकट्या भावाचा म्हणजेच अबराम खानचा वाढदिवस असल्याने तो हा वाढदिवस साजरा करत असेल. तर आता तो काय करणार या प्रश्नाचं उत्तर ही मिळालं आहे. तर तो चित्रपट निर्मितीचा कोर्स करण्यासाठी अमेरिकेत जाऊ शकतो असे म्हटलं आहे.

अमेरिकेत जाण्याची शक्यता

ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान चित्रपट निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यन खानच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘आता आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यामुळे तो आता कायदेशीररित्या आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतो. त्याला चित्रपट निर्मितीची योजना पूर्ण करायची आहे. आर्यनने याआधीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ शो सादर केला आहे. आणि त्याला स्क्रिप्ट रायटिंगमध्ये जाऊन दिग्दर्शन करायचे आहे.

या प्रोजेक्टबद्दल एका सूत्राने पिंकविलाला सांगितले की, ‘हा प्रोजेक्ट लिहिण्यासोबतच आर्यन त्याचे दिग्दर्शनही करणार आहे. यासाठी त्यांनी बरीच तयारी केली असून, त्यांनी पदभारही स्वीकारला आहे, ज्याचे टेस्ट शूट शुक्रवार आणि शनिवारी केले जाऊ शकते. त्याचा एक भाग असल्याने आणि क्रूच्या तयारीबद्दल बोलताना आर्यनला या प्रोजेक्टच्या शूटिंगपूर्वी सर्वांना एकत्र आणायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे. या शीर्षक नसलेल्या शोबद्दल तो खूप उत्कट आहे आणि त्याच्या प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू केले आहे. तो लवकरच शूटिंगची तारीख फायनल करणार आहे.

आर्यन खान एकटाच पोहोचला होता

यादरम्यान आर्यन खान नुकताच करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिकरित्या दिसला. या पार्टीत तो एकटाच पोहोचला होता. या पार्टीत शाहरुख खान आणि गौरी खान एकत्र पोहोचले होते.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.