Arijit Singh | प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

अरिजीतच्या आई गेल्या काही दिवसांपासून ECMO वर होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. (Singer Arijit Singh’s mother dies)

Arijit Singh | प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी
Singer Arijit Singh’s mother dies
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:01 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा पार्श्वगायक अरिजीत सिंह (Arijit Singh) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरिजीत सिंहच्या मातोश्रींचे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. कोलकातामधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Singer Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata)

अरिजीतच्या आई गेल्या काही दिवसांपासून ECMO वर होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कोलकात्याच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिक ढासळली. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता

अरिजीतच्या आईला ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याची पोस्ट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी 6 मे रोजी सोशल मीडियावर लिहिली होती. स्वस्तिकाच्या पोस्टवर कमेंट करुन चाहत्यांनी रक्तदान करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. स्वस्तिका मुखर्जीशिवाय भूमी पेडणेकर, तापसी पन्नू सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड, औषधे आणि इतर अनेक गोष्टींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतीचं आवाहन केलं होतं.

अरिजीत सिंहची कारकीर्द

अरिजीत सिंहने वयाच्या 18 व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली. तो ‘फेम गुरुकुल’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. ‘आशिकी 2’ या चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्याने अरिजीतला ओळख मिळवून दिली. त्याच्या आवाजातील ‘कबीरा’, ‘राब्ता’, ‘खैरियत’, ‘अगर तुम साथ हो’ अशी अनेक सुपरहिट गाणी गाजली आहेत. अरिजीतच्या आवाजातील दर्द कायमच चाहत्यांना भुरळ पाडतो. (Singer Arijit Singh’s mother dies)

पहिल्यांदाच बनणार संगीतकार

सान्या मल्होत्राच्या आगामी चित्रपटाद्वारे अरिजीत सिंहने संगीतकार म्हणून पुढचे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने याबाबत माहिती दिली आहे. ‘पगलेटसाठी संगीत तयार करून मला खूप अभिमान वाटतो. हा अल्बम मी ए.आर. रहमान यांना समर्पित करतो, ज्यांनी मला भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल बरेच काही शिकवले. मी नेहमीच त्यांच्याद्वारे प्रेरित झालो आहे.’ असे त्याने लिहिले आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

गायक अरिजित सिंहची आई रुग्णालयात, रक्ताची गरज, अभिनेत्रीने सोशल मीडियावर मागितली मदत

(Singer Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.