गायक अरिजित सिंहची आई रुग्णालयात, रक्ताची गरज, अभिनेत्रीने सोशल मीडियावर मागितली मदत

गायक अरिजित सिंहची आई रुग्णालयात, रक्ताची गरज, अभिनेत्रीने सोशल मीडियावर मागितली मदत
अरिजित सिंह

बॉलिवूड गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) यांच्या आईची तब्येत खूप ढासळली आहे. त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरिजितच्य आईला ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता आहे.

Harshada Bhirvandekar

|

May 06, 2021 | 2:35 PM

मुंबई : बॉलिवूड गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) यांच्या आईची तब्येत खूप ढासळली आहे. त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरिजितच्य आईला ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता आहे, ज्यासाठी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. स्वस्तिकासोबतच दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी देखील लोकांकडे मदतीसाठी विचारणा करत आहेत (Arijit Singh mother hospitalized in Kolkata needs A negative blood urgently swastika Mukherjee ask for help).

स्वस्तिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांची मदत मागितली होती. त्यांनी लिहिले की, ‘गायक अरिजीत सिंहच्या आईसाठी ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची गरज आहे. त्या कोलकाताच्या एएमआरआय धकुरिया रूग्णालयामध्ये दाखल आहेत. तसेच रक्तदाता पुरुष असला पाहिजे’, असेही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्याचवेळी दिग्दर्शक श्रीजितने बंगाली भाषेत ही पोस्ट कॉपी करुन शेअर केली आहे.

पाहा पोस्ट :

चाहतेही पुढे सरसावले!

स्वस्तिकाच्या पोस्टवर भाष्य करून चाहते त्या स्थानाबद्दल अधिक विचारणा करत आहेत, जेणेकरुन ते रक्तदान करू शकतील. अरिजितच्या आईच्या तब्येतीबाबत अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. स्वस्तिका मुखर्जीशिवाय भूमी पेडणेकर, तापसी पन्नू सारख्या अनेक बॉलिवूड सेलेब्स ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड, औषधे आणि इतर अनेक गोष्टींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना मदत करत आहेत (Arijit Singh mother hospitalized in Kolkata needs A negative blood urgently swastika Mukherjee ask for help).

गायक अरिजित सिंह यांनी वयाच्या 18व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली. तो ‘फेम गुरुकुल’ या गायन रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. ‘आशिकी 2’ या चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्याने अरिजितला ओळख मिळवून दिली. त्यांनी ‘कबीरा’, ‘राब्ता’, ‘खैरियत’, ‘अगर तुम साथ हो’ अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

पहिल्यांदाच बनणार संगीतकार

सान्या मल्होत्राच्या आगामी चित्रपटाद्वारे अरिजीत सिंहने संगीतकार म्हणून पुढचे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘पगलेटसाठी संगीत तयार करून मला खूप अभिमान वाटतो. हा अल्बम मी ए.आर. रहमान यांना समर्पित करतो, ज्यांनी मला भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल बरेच काही शिकवले. मी नेहमीच त्यांच्याद्वारे प्रेरित झालो आहे.’

(Arijit Singh mother hospitalized in Kolkata needs A negative blood urgently swastika Mukherjee ask for help)

हेही वाचा :

Indian Idol 12 | आशिष कुलकर्णीचं गाणं ऐकून अनु मलिकने पकडले कान, पाहा पुढे काय झालं…

डोंबिवलीची फास्ट ट्रेन ते स्वतःची कार, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या मैत्रीचा अनोखा किस्सा!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें