AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीची फास्ट ट्रेन ते स्वतःची कार, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या मैत्रीचा अनोखा किस्सा!

लोकप्रिय विनोदवीर जोडी म्हणजे भाऊ अर्थात भालचंद्र कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike). 2000पासून सुरु झाली ही मैत्री आज 2021मध्ये आणखी बहरताना दिसतेय. त्यांच्या या मैत्रीचे अनेक किस्से नुकतेच दोघांनी कार्यक्रमात शेअर केले आहेत.

डोंबिवलीची फास्ट ट्रेन ते स्वतःची कार, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या मैत्रीचा अनोखा किस्सा!
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके
| Edited By: | Updated on: May 06, 2021 | 11:05 AM
Share

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ हा संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम रसिकांसाठी नेहमीच खुमासदार मनोरंजनाची मेजवानी घेऊन येतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातीलच एक लोकप्रिय विनोदवीर जोडी म्हणजे भाऊ अर्थात भालचंद्र कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike). 2000पासून सुरु झाली ही मैत्री आज 2021मध्ये आणखी बहरताना दिसतेय. त्यांच्या या मैत्रीचे अनेक किस्से नुकतेच दोघांनी कार्यक्रमात शेअर केले आहेत (Bhau Kadam And Kushal Badrike share their friendship story on CHYD set).

कशी झाली या मैत्रीला सुरुवात?

या मैत्रीच्या नात्याच्या सुरुवातीविषयी सांगताना कुशल म्हणतो, ‘मी नेहमीच भाऊचा खूप मोठा फॅन होतो, आहे आणि कायम राहणार आहे. आम्ही दोघे ‘यदा कदाचित’ या नाटका दरम्यान भेटलो होतो. त्यावेळी मी भाऊच्या अभिनयाने भारावून गेलो. त्यानंतर आम्ही हळू हळू एकमेकांशी बोलायला लागलो. दोघेही एकाच ठिकाणी राहायला होतो. एकत्रच प्रवास करायचो त्यामुळे हे नातं खूप घट्ट झालं.’

कारचा किस्सा…

भाऊ असो वा कुशल सुरुवातीच्या काळात दोघांनाही खूप संघर्ष करावा लागला होता. डोंबिवलीतून लोकल पकडून ते दोघे शूटिंगला हजार व्हायचे. त्यावेळी दोघेही ‘फू बाई फू’मध्ये काम करत होते. एक ट्रेन चुकली तर वेळेत पोहोचणार नाही. म्हणून मिळेल ती गाडी पकडून कितीही गर्दी असो त्या सगळ्या गोष्टी सहन करत, त्यांची मैत्री आणखी घट्ट होत होती. अशावेळी त्यांच्या एका कलाकार मित्राने त्यांना सोबत येण्याविषयी विचारलं. अर्थात तो मित्र ठाण्यातून शूटिंगसाठी जायचा. मग त्याने भाऊ आणि कुशलला ठाण्यात उतरून आपल्यासोबत कारने पुढील प्रवास करावा असे सुचवले. यावर भाऊ आणि कुशलने होकार देखील दिला. ते तिघे सोबत प्रवास करत होते (Bhau Kadam And Kushal Badrike share their friendship story on CHYD set).

एक दिवशी भाऊ आणि कुशलला नेहमीच्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला. त्यावेळी त्या कारवाल्या मित्राने त्यांना खूप गोष्टी सुनावल्या. यावर कुशालने त्याला समजवण्याचा प्रयत्न देखील केला की, नेहमीपेक्षा ट्रेनला जास्त गर्दी होती, म्हणून ट्रेन पकडताच आली नाही. मात्र, यावर त्या मित्राने पुन्हा एकदा त्यांना उपकाराचे बोल सुनावले. त्यावेळी मात्र दोघांनी त्या मित्रासोबत प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भाऊ कुशलला म्हणाले की, उद्या हीच लोकं आपल्याला कार घ्यायला भाग पडतील बघ!

आजही एकाच गाडीने प्रवास…

त्यानंतर कुशल आणि भाऊ कुशलच्या बाईकवरून डोंबिवली ते मीरारोड हा पल्ला दररोज पार करू लागले. संघर्षाचा काळ सुरूच होता. बाईकमध्येही अर्धे-अर्धे पैसे काढून ते पेट्रोल भरून, प्रवास करायचे. पण या सगळ्यातही त्यांच्या मैत्रीत कधीच दुरावा आला नाही. आता या दोन्ही कलाकारांकडे नाव, प्रसिद्धी आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहे. दोघांकडेही दोन-दोन गाड्या आहे. मात्र, आजही हे दोन मैत्र एकाच गाडीतून प्रवास करतात. म्हणजे जर भाऊ आणि कुशल एकाच गाडीत असतील तर दोघांपैकी एकाची गाडी ड्रायव्हरसह रिकामी येते आणि रिकामीच जाते. भाऊ आणि कुशलची ही मैत्री आणि दोघांमधील जिव्हाळा हा त्यांचा चाहत्यांना देखील खूप आवडतो.

(Bhau Kadam And Kushal Badrike share their friendship story on CHYD set)

हेही वाचा :

तापसीच्या आगामी चित्रपटातील ‘या’ व्यक्तीचे कोरोनामुळे निधन, सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली

Photo : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत धामधूम, अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पार पडणार?, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.