
बॉलिवूडची 'दबंग' हिरोईन सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल आज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. दोघांचे धर्म हे वेगवेगळे असल्याने दोघांनी रजिस्ट मॅरेज करणं पसंत केलं आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या प्रेम प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर दोघांच्या प्रेमाचं रुपांतर आता पती-पत्नीच्या नात्यात झालं आहे. सोनाक्षीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंसोबत काही लिहिलं आहे. यामधून ती व्यक्त झाली आहे. यातून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तिने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या प्रेमाच्या प्रवासाविषयी ती व्यक्त झाली आहे.

"आजच्याच दिवशी, सात वर्षांपूर्वी 23 जून 2017 ला आम्ही एकमेकांच्या डोळ्ंयात एकमेकांप्रती शुद्ध प्रेम पाहिले होते, आणि आम्ही ते जपण्याचा निर्धार केला होता. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हानं आणि यशामध्ये मार्गदर्शन केलंय. आम्हाला या क्षणापर्यंत नेवून सोडलंय, जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवतांच्या आशीर्वादाने, आता आम्ही पती आणि पत्नी आहोत", असं सोनाक्षी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाली आहे. "इथे आतापासून ते आयुष्यभरासाठी प्रेम, आशा आणि सर्व गोष्टी एकमेकांसोबत सुंदर आहेत", अशी भावना सोनाक्षीने व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या फोटो सोनाक्षीसोबत तिचे वडील तथा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे देखील दिसत आहेत. या लग्नाची विशेषत: अशी की, स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत दोघांचे लग्न झालं आहे. अशा परिस्थितीत दोघांनीही धर्म बदलण्याची गरज राहणार नाही.