दिलीप कुमारांना राखी बांधणाऱ्या लतादिदींनी एका गाण्यामुळे 13 वर्ष धरला होता अबोला! वाचा ‘लागी नही छूटे रामा’ गाण्याचा किस्सा…

अभिनेते दिलीप कुमार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे खूप खास नाते होते. वास्तविक दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना आपली लहान बहीण मानले होते. लता मंगेशकर देखील दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. पण या नात्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा या दोघांनी एकमेकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते.

दिलीप कुमारांना राखी बांधणाऱ्या लतादिदींनी एका गाण्यामुळे 13 वर्ष धरला होता अबोला! वाचा ‘लागी नही छूटे रामा’ गाण्याचा किस्सा...
Lata Mangeshkar And Dilip Kumar
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:45 AM

मुंबई : दिलीप कुमार (Dilip Kumar) हे बॉलिवूडचे असे अभिनेते होते, ज्यांना चित्रपट जगतात ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखले जाते. ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलीप कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनेते दिलीप कुमार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे खूप खास नाते होते. वास्तविक दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना आपली लहान बहीण मानले होते. लता मंगेशकर देखील दिलीप कुमार यांना राखी बांधायच्या. पण या नात्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा या दोघांनी एकमेकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते.

13 वर्षे एकमेकांशी धरला अबोला!

लता मंगेशकर आणि दिलीप कुमार जवळपास 13 वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते आणि हा अबोला सुमारे 1970 पर्यंत चालू राहिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, संगीतकर सलील चौधरी यांनी ‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘लागी नही छूटे’ हे गाणे गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड केली. मात्र, लता मंगेशकर यांना माहित नव्हते की, दिलीप कुमार त्यांच्यासोबत एक गाणे गाणार आहेत. तेव्हा दोघांमधील हे मतभेद सुरू झाले.

दिलीप कुमारांमुळे लता मंगेशकर गोंधळात!

खरं तर, जेव्हा लता मंगेशकर यांना कळले की, दिलीप कुमार देखील चित्रपटात त्यांच्यासोबत एक गाणे गाणार आहेत, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की, दिलीप कुमार नक्की गाऊ शकतील का? ‘लागी नही छूटे’ हे गीत सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केले होते. अभिनेते दिलीप कुमार यांनी सितारमध्ये सूर मिसळून या गाण्यासाठी गायनाचा पूर्ण रियाजही केला होता.

गाणे गाताना दिलीप कुमार घाबरले!

दिलीप कुमार लता मंगेशकर यांच्यासोबत एक गाणे गाण्यात घाबरले होते. जेव्हा हे गाणे रेकॉर्ड करण्याचा विषय आला तेव्हा, ते थोडे नर्व्हस होऊ लागले. वास्तविक, दिलीप कुमार यांची ही अस्वस्थता लता मंगेशकरांना पाहून झाली होती. कारण त्या खूप चांगल्या गायिका होत्या. दिलीप कुमारच्या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी सलील चौधरी यांनी त्यांना ब्रँडी पिण्यास दिली. ;लागी नही छूटे’ हे गाणे सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केले होते.

दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद

सलील चौधरींनी दिलेली ब्रँडी प्यायल्यानंतर दिलीप कुमार यांनी लता मंगेशकरांसोबत एक गाणे गायले, पण रेकॉर्डिंग दरम्यान त्यांचा आवाज लता मंगेशकरांच्या आवाजासमोर खूपच कमकुवत होता. लता मंगेशकर यांनी रेकॉर्डिंगमध्ये त्यांचे पूर्ण योगदान दिले. या रेकॉर्डिंगनंतर दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात जो मतभेद सुरू झाला, तो बराच काळ टिकला. 1970 मध्ये जेव्हा त्यांच्यातील दुरावा संपला, तेव्हा लता मंगेशकरांनी पुन्हा एकदा दिलीप कुमार यांना राखी बांधली.

या वरून झाला मतभेत

दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद सुरु झाले होते.  दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्यातील संभाषण बंद झाले, जेव्हा दिलीप कुमार यांनी लता मंगेशकरांना पाहून मराठी भाषिक लोकांसाठी उर्दू म्हणजे डाळ-भातासारखी आहे, अशी टिप्पणी केली होती. दिलीप कुमारांची ही गोष्ट लता मंगेशकरांना अशा प्रकारे जिव्हारी लागली की, त्यांनी दिलीप कुमार यांच्याशी बोलणेच बंद केले नाही, तर उर्दू शिकण्याचा निर्णय देखील घेतला होता.

हेही वाचा :

चेहऱ्यावर धूळ तर डोळ्यात विजयाची स्वप्न, तापसी पन्नूच्या आगामी ‘रश्मि रॉकेट’चं नवं पोस्टर पाहिलंत का?

शाहरुख खान-नयन ताराच्या आगामी चित्रपटाची कथा चोरीवर आधारित, ‘मनी हाईस्ट’पासून घेतलीय प्रेरणा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.