Happy Birthday Ramya Krishnan | श्रीदेवीने नाकारलेली भूमिका वाट्याला आली, ‘शिवगामी’ बनून राम्या कृष्णनने प्रसिद्धी मिळवली!

एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले आणि प्रत्येकजण आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. यापैकी एक राम्या कृष्णन (Ramya Krishnan) आहे, ज्यांनी या चित्रपटात शिवगामीची भूमिका साकारली आहे.

Happy Birthday Ramya Krishnan | श्रीदेवीने नाकारलेली भूमिका वाट्याला आली, ‘शिवगामी’ बनून राम्या कृष्णनने प्रसिद्धी मिळवली!
Ramya Krishnan

मुंबई : एस एस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले आणि प्रत्येकजण आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. यापैकी एक राम्या कृष्णन (Ramya Krishnan) आहे, ज्यांनी या चित्रपटात शिवगामीची भूमिका साकारली आहे. राम्याचा अभिनय आणि व्यक्तिरेखा दोन्हीही प्रेक्षकांना खूप आवडल्या. आज, राम्या आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आज आपण त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…

राम्याचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नई येथे झाला. राम्याने दक्षिणसोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी ‘वेल्लई मनसू’ या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटात रमल्यानंतर राम्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

शिवगामीच्या भूमिकेची ऑफर श्रीदेवीला!

राम्यासाठी ‘बाहुबली’ हा चित्रपट तिला वेगळी ओळख देण्यात यशस्वी झाला आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की, ही भूमिका राम्यापूर्वी श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. पण, जास्त फीमुळे त्यांनी श्रीदेवीला साईन केले नाही. अहवालांवर विश्वास ठेवला तर, श्रीदेवीने चित्रपटासाठी 6 कोटी फी मागितली होती. तसेच, श्रीदेवीने तिच्यासाठी पंचतारांकित हॉटेलचा संपूर्ण मजला बुक करण्यास सांगितले होते. जास्त शुल्क आणि मागणीमुळे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी रम्या कृष्णनला साईन केले आणि हा चित्रपट रम्यासाठी मैलाचा दगड ठरला.

चित्रपटाचे बजेट आधीच खूप जास्त होते, यामुळे दिग्दर्शकाने राम्याला साईन केले आणि त्यात आणखी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आणि हाच चित्रपट राम्यासाठी मैलाचा दगड ठरला.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये केले काम

राम्याने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात यश चोप्रा यांच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून केली. यानंतर त्या ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘बनारसी बाबू’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. अहवालांवर विश्वास ठेवायचा, तर राम्याने आतापर्यंत 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या साऊथच्या टीव्ही चॅनल्सवरही खूप सक्रिय आहे.

राम्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी जवळजवळ प्रत्येक चित्रपटात बोल्ड सीन्स केले होते. अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटात त्या ‘लव्ह लेडी’ म्हणून दिसल्या होत्या. त्याचबरोबर राम्या ‘वजूद’ चित्रपटात लिप लॉक करताना दिसल्या होत्या.

रम्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्यांनी 2003मध्ये कृष्णा वंशीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा ऋत्विक देखील आहे.

हेही वाचा :

कधीकाळी ‘लव्ह बर्ड्स’ म्हणून ओळखल्या जायच्या ‘या’ जोड्या, कलाकारांच्या ब्रेकअपनंतर प्रेक्षकही झाले नाराज!

अमिताभ बच्चन घरातून पळून आले असे वाटल्याने दिग्दर्शकाने केला होता थेट वडिलांना फोन! वाचा किस्सा

Love Story : बिग बॉसपासून झाली प्रेमाची सुरुवात, जाणून घ्या प्रिन्स नरुला आणि युविकाची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा झळकणार मणिरत्नमच्या चित्रपटात, 400 ज्युनिअर आर्टिस्टसोबत शूट केले ‘पोन्नीयन सेल्वन’चे गाणे!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI