Sunny Leone : सनी लियोनीने ‘नॉटी’ म्हणत नवऱ्यासोबतचा ‘तो’ वाला व्हिडीओ केला शेअर

सनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने आपल्या पतीचा तो वाला व्हिडीओ शेअर केला आहे.

Sunny Leone : सनी लियोनीने नॉटी म्हणत नवऱ्यासोबतचा तो वाला व्हिडीओ केला शेअर
सनी लिओनी हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये बाॅलिवूड क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये. विशेष म्हणजे चित्रपटांसाठीही सनी लिओनी ही तगडी फिस आकारते.
| Updated on: May 24, 2023 | 9:30 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. सनी लिओनीनं आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये काम केलं आहे. तसंच तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही सनीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

सनी लिओनी ही तिच्या अभिनयामुळे, बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असतेच. पण त्यासोबतच ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. सनी लिओनी नेहमी तिच्या कुटुंबासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर करत असते. सनी तिचा पती डॅनियल वेबर आणि तिचे दोन जुळी मुले आणि तिने दत्तक घेतलेले मुलगी निशा यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिचं हे गोड कुटुंब नेहमी चर्चेत असतं. आताही सनीने तिचा पती डॅनियल वेबर सोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ-

 

सनीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती पती डॅनियल वेबर सोबत ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. त्यावेळी अचानक डॅनियल सनीसोबत नॉटी होताना दिसतो. या मजेशीर व्हिडिओला सनीनं कॅप्शन दिलं आहे की, जेव्हा तुमचा पती नॉटी होतो. सोबत तिनं हसण्याच्या दोन इमोजी शेअर केल्या आहेत. सध्या सनी आणि डॅनियलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.