एक्स बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेन हिचा फोटो पाहून नेटकरी भडकले, चारू असोपा आणि राजीव यांनाही सुनावले

दोनदा चारू असोपा हिने राजीव सेनसोबत घटस्फोट घेण्याचे ठरवले असल्याचे स्वत: अभिनेत्रीने सांगितले होते.

एक्स बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेन हिचा फोटो पाहून नेटकरी भडकले, चारू असोपा आणि राजीव यांनाही सुनावले
| Updated on: Jan 06, 2023 | 5:37 PM

मुंबई : सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. चारू असोपा हिने राजीव सेन याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. चारू असोपा म्हणाली होती, मी प्रेग्नेंट असताना राजीव सेन हा मला धोका देत होता. यासोबतच तिने इतरही आरोप केले होते. राजीव यानेही चारूचे एका फेमस टीव्ही अभिनेत्यासोबत अफेअर सुरू असल्याचे सांगत मोठा धक्का दिला होता. राजीव आणि चारू यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.

दोनदा चारू असोपा हिने राजीव सेनसोबत घटस्फोट घेण्याचे ठरवले असल्याचे स्वत: अभिनेत्रीने सांगितले होते. मात्र, दरवेळी तिने आपल्या रिलेशनला एक संधी दिली. चारू आणि राजीव यांची एक मुलगी देखील आहे.

चारू आणि राजीव यांचा घटस्फोट होणार असल्याचे जवळपास नक्कीच आहे. परंतू नुकताच एका फॅमिली फंक्शनमधील चारू आणि राजीव यांचा फोटो पुढे आलाय. या फोटोमध्ये सुष्मिता सेन देखील दिसत आहे. अनेकांनी सुष्मिता सेन हिच्या भावाचे पत्नीसोबतचे भांडणे नकली असल्याचे देखील म्हटले आहे.

राजीव याचे पूर्ण कुटुंब या फोटोमध्ये दिसत असून यामध्ये सर्वजण आनंदी आहेत. आता हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या फोटोमध्ये सुष्मिता सेन तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे.

अनेकांनी हा फोटो बघितल्यावर सुष्मिता सेन हिच्यावर टीका करण्यास देखील सुरूवात केलीये. हे असे कसे ब्रेकअप असल्याचा प्रश्नही अनेकांनी सुष्मिता सेन हिला विचारला आहे.