Swara Bhasker | पप्पूला घाबरलात? स्वरा भास्कर हिने सुनावले खडेबोल, थेट म्हणाली…

| Updated on: Mar 24, 2023 | 6:18 PM

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत लग्न केल्याचे जाहिर केले आणि तेंव्हापासूनच स्वरा भास्कर ही चर्चेत आली.

Swara Bhasker | पप्पूला घाबरलात? स्वरा भास्कर हिने सुनावले खडेबोल, थेट म्हणाली...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जानेवारी महिन्यातच स्वराने लग्नगाठ बांधली. मात्र, काही दिवस स्वरा भास्कर हिने लग्न केल्याचे सर्वांपासून लपवून ठेवले. समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद (Fahad Ahmad) याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर चर्चेत आली. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. नेटकऱ्यांनी चांगलेच खडेबोल स्वरा भास्कर हिला सुनावले. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच हिंदू रितीरिवाजाप्रमाणे फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. आता या प्रकरणावर स्वरा भास्कर हिने मोठी प्रतिक्रिया दिलीये. एएनआईचे ट्विट रिशेअर करत स्वरा भास्कर हिने मोठी पोस्ट लिहिलीये. आता स्वरा भास्कर हिची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपली भडास काढताना स्वरा भास्कर ही दिसत आहे.

स्वरा भास्कर हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, त्यांना तथाकथित पप्पूची इतकी जास्त भीती वाटते. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता रोखण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आलायं. राहुल गांधी 2024 साली होणारी लोकसभा निवडणूक लढवू नयेत, त्यासाठी हे सर्व केले जात आहे. पण यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता आणखी वाढेल, असा मला विश्वास वाटतो.

आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी आता स्वरा भास्कर हिच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये. अनेकांनी स्वरा भास्कर बरोबर म्हणत असल्याचे देखील म्हटले आहे. दुसरीकडे अनेकांच्या पचनी ही स्वरा भास्कर हिची पोस्ट पडली नाहीये. आता या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचे रिसेप्शन दिल्ली येथे पार पडले. या रिसेप्शनला अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. राहुल गांधी देखील स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या रिसेप्शनला पोहचला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील उपस्थित होते. स्वरा भास्कर हिने मेहंदी, हळदी आणि लग्नाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले होते.